खासदार तटकरे, जागा वाटपाचा निर्णय समन्वय समितीत होणार
गुहागर, ता. 08 : 2014 मध्ये मी खासदारकी लढवायला इच्छुक नव्हतो. मात्र पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला. म्हणून लोकसभा लढवली. 2019 मध्ये खासदार झालो. गेल्या 5 वर्षात मी दिल्लीत रमलो आहे. आता तर 2024 नंतर एनडीएचे सरकार केंद्रात येणार आहे. सत्ताधारी पक्षाचा खासदार म्हणून दिल्लीत गेलो तर महाराष्ट्राच्या विकासाचे अनेक प्रश्र्न आपण सोडवू शकतो. त्यामुळे दिल्लीत जायला नक्की आवडेल. मात्र उमेदवारीचा निर्णय महायुतीत होईल. असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले. MP Tatkare on a visit to Guhagar
गुहागरच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना खासदार तटकरे म्हणाले की, लोकसभा सदस्य म्हणून सातत्याने गुहागर विधानसभा मतदारसंघात संपर्क ठेवणे ही माझी जबाबदारी आहे. मात्र अजितदादांबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीच्या सत्तेत सहभागी झालो. राष्ट्रवादी पक्षाने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. त्यामुळे गुहागर मतदारसंघात जनसंपर्क ठेवण्यात कमी पडलो. याची खंत आहे. आज इथे आल्यानंतर महायुतीतील मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी माझी भेट घेतली. इथे महायुतीत चांगले वातावरण आहे. याचा आनंद वाटला. नुकतीच महायुतीची समन्वय समितीची बैठक झाली. 14 तारखेला महायुतीचा एकत्रीत मेळावा राज्यात 35 ठिकाणी निश्चित केला आहे. MP Tatkare on a visit to Guhagar
प्रत्येक मेळाव्याला तेथील पालकमंत्री, महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी प्रामुख्याने या मेळाव्याला उपस्थित रहातील. 15 फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्रातील 6 विभागात विभागीय मेळावे होतील. या मेळाव्यांना मा. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित रहातील. त्यानंतर शेवटचा मोठा राज्यव्यापी मेळावा मुंबईत फेब्रुवारी अखेरीपर्यंत होईल. राज्यात 45 हून अधिक लोकसभेच्या जागा निवडून आणण्याचा निर्धार आम्ही केला आहे. गेल्या 10 वर्षात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवशाली कामगिरी मोदीजींनी केली आहे. तिसऱ्यांदा एनडीए सत्तेत येण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील रहाणार आहोत. MP Tatkare on a visit to Guhagar