राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनिल तटकरे यांची माहीती
गुहागर, ता. 18 : सागरमाला, भारतमाला यामधून गुहागरसाठी काही करता येईल का यासाठी मी प्रयत्न करत असून पर्यटन वाढीसाठी विशेष कामे प्रस्तावीत करणार आहोत. यासाठी पर्यटनमंत्री गजेंद्रसींग शेखावत यांच्याजवळ माझ्या दोन बैठका झाल्या असल्याची माहीती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. MP Sunil Tatkare’s visit to Guhagar
खासदार सुनिल तटकरे यांनी गुहागर शासकीय विश्रामगृहावर आढावा बैठक घेतली. या बैठकीतून ते माहीती देताना बोलत होते. आढावा बैठकीतून गुहागर नगरपंचायतीच्या प्रस्तावीत नळपाणी पुरवठा योजनेबाबत विशेष लक्ष देत सदर योजनेला तांत्रीक मान्यता अजून का मिळाली नाही. याबाबत संबधीत ठेकेदाराजवळ फोनवरून संपर्क करून येत्या आठ दिवसात तांत्रीक मंजूर दयावी. MP Sunil Tatkare’s visit to Guhagar
अशी समज दिली. तालुक्यातील टांचाईग्रस्त गावांची माहीती घेताना केवळ दोन गावांची मागणी येऊ शकते. यावर गटविकास अधिकारी यांनी गावे नाहीत तर वाडयांना प्रत्यक्ष भेट दयावी. व टंचाईग्रस्त गावांची पाणी टंचाई दूर करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याच्या सुचना केल्या. त्यानंतर पत्रकारांजवळ बोलाताना गुहागर विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील अडीच किलोमिटर अंतरावरील भूसंपदानाची माहीती घेत. सदर भूसंपादीत जागांना सांगलीच्या धर्तीवर मोबदला मिळण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. तशा प्रकारे मोबदला मिळाला तर येथील शेतकऱ्यांना जमिनीला चांगला दर मिळेल. तसेच कोस्टल हायवेच्या करंजा, रेवस आगरदंडा ते तुरंबाड, बागमांडला ते बानकोटे, जयगड, केळशी याठिकाणातील ९ पुलांच्या निविदा काढून त्यांच्या वर्क ऑर्डर देण्यात आल्या आहेत. यामुळे तीन टप्यामध्ये या महामार्गाचे काम होत असल्याची माहीती कोस्टल महामार्गाच्या आखडीमध्ये बदल करण्यात आला आहे. हा महामार्ग सागरी पट्टयातूनच जावा असा माझा आग्रह आहे. परंतु काही शहरे मध्ये येत असल्याने शहराला वगळून नवीन आखणी केल्याचे समजते. पर्यटनाच्या दृष्टीने हा मार्ग शहरातूनच जावा असा माझा आग्रह राहील. बाहेरून रस्ता गेला तर शहराचे महत्वही कमी होईल. शहरातून गेला तर घरे व जागांचे भूसंपादन करावे लागेल. यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन काम करावे लागेल. रस्त्याच्या कामांचेपण टप्पे करावेत. MP Sunil Tatkare’s visit to Guhagar


रायगडपासूनच रस्ता सुरू होतो. करंजा, रेवस, रत्नागिरी असा तीन टप्यामध्ये याचे काम सुरू व्हावे. यासाठी अर्थसंकल्पातून अधिकचा नीधीसाठी प्रयत्न करणार आहे. मला जास्त लक्ष गेल व आरजीपीपीएलवर करायचे आहे. नॅचरल गॅस कमिटीचा मी अध्यक्ष असून स्टँडींग कमिटीची लवकच बैठक बोलवणार आहे. सागरमाला, भारत माला या योजनेतर्गत आपण गुहागरसाठी नेमके काय करू शकतो. बजटमधील प्रोव्हीजन नुसार बजटमधून काही प्रस्ताव देऊ शकतो का ते पहाणार आहे. यासाठी पर्यटन विभागाचे मंत्री गजेंद्रसींग शेखावत यांच्यावळ दोन वेळा बैठक, जलसंपदा मंत्री सी. आर. पाटील तसेच मत्स्यविभाग खत्याचे मंत्री यांच्याजवळ याविषयी चर्चा करणार आहे. पर्यटन वाढीसाठी मत्स्य आणि बंदर व्यवसायाच्या दृष्टीने भारतसरकारकडे कोणते प्रस्ताव पाठवू शकतो. यासाठी ५० टक्के केंद्र व ५० टक्के राज्य सरकार सहभाग घेण्यासंदर्भात आपण चर्चा करणार आहोत. राज्यात महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका हव्या आहे. आरक्षणाबाबत गेली तीन वर्षे सर्वोच्च न्यायालयात याचीका प्रलंबीत याच्या लवकर निर्णयासाठी सरकार अपीलात गेले. तो निर्णय झाल्यानंतर मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांची एकत्रीत बैठक होऊन या निवडणूका एकत्रीत लढवीण्यासंदर्भातील निर्णय होईल. असे शेवटी सांगितले. MP Sunil Tatkare’s visit to Guhagar