खासदार सुनील तटकरे, भाजपची अवस्था केविलवाणी
गुहागर, ता. 26 : माझ्याही मनात कोण मुख्यमंत्री व्हावे हे जरुर आहे. पण योग्य वेळ येईल त्यावेळी माझी भावना पक्षश्रेंष्ठीपुढे मी मांडेन. राष्ट्रवादीत कधीच स्पर्धा नव्हती. फलक लावणे चुकीचे आहे. लोकशाही पध्दतीने आम्ही नेता निवडतो. असे मत खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. ते गुहागरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. MP Sunil Tatkare on visit to Guhagar
आरजीपीपीएल मध्ये केंद्राचा हस्तक्षेप हवा
गुहागर दौऱ्यावर आलेल्या खासदार सुनील तटकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यात विजेचे उत्पादन आणि मागणी सारखी आहे. आरजीपीपीएलची वीज महागडी असल्याने अन्य खरेदीदार मिळत नाही. हा प्रकल्प चालू रहाण्यासाठी भारत सरकारने यात हस्तक्षेप करण्याची गरज आहे. MP Sunil Tatkare on visit to Guhagar

सरकार निवडणुकांपासून पळ काढतयं
ग्रामपंचायत निवडणुका मविआ म्हणून लढलो असलो तरी तेथे कोणाला किती जागा मिळाल्या याचा निश्चित आकडा कळु शकत नाही. खरा कस स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लागेल. मात्र राज्यातील मायबाप सरकारने अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वर्ष, सव्वा वर्षापासून रखडविल्या आहेत. हे सरकार निवडणुकांपासून पळ काढतयं. या निवडणुका ताबडतोब घ्याव्यात. त्यात खरी शक्ती समजेल. MP Sunil Tatkare on visit to Guhagar
कुळकायद्यात बदल केला
बाळासाहेब आंबेडकरांनी रामपूरमध्ये कुळकायद्याबाबत काही झाले नाही असा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना तटकरे म्हणाले की, विलासराव मुख्यमंत्री असताना रत्नागिरीत झालेल्या अधिवेशन बेदखल कुळांचे प्रश्र्न सोडविण्यासाठी कुळ कायद्यामध्ये बदल केला. त्याची अमंलबजावणी सुरु झाली. काही बेदखल कुळांना नव्या कायद्याचा लाभही मिळाला. मात्र त्याची निश्चित आकडेवारी नाही. MP Sunil Tatkare on visit to Guhagar
मविआ एकत्र लढणार
माजी आमदार संजय कदम यांच्याबाबत ते म्हणाले की, ते शिवसेनेशी लढत देवून राष्ट्रवादीचे आमदार झाले. आता त्यांनी उद्धवजींच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र सध्या राज्यात ज्या वेगाने घडामोडी घडत आहेत त्या पार्श्र्वभुमीवर आम्ही मविआ म्हणून एकत्र लढण्याचे निश्चित केले आहे. अशावेळी राष्ट्रवादी पुरते बोलायचे झाले तर त्यांचा निर्णय दुर्दैवी आणि अयोग्य आहे. MP Sunil Tatkare on visit to Guhagar
मविआचे भाजपसमोर आव्हान
कसबा आणि चिंचवड या पोटनिवडणुकीत मविआने भाजपसमोर जबरदस्त आव्हान उभे केले आहे. नेहमीच कसबा भाजपचा राहीला तरीही ऑक्सिजन लावून खासदार गिरीश बापट यांना प्रचारात आणावे लागले. या पूर्वीही आजारी असताना कै. मुक्ता टिळक आणि कै. लक्ष्मण जगताप यांना भाजपने मतदानासाठी आणले. यावरुन भाजप सत्तेसाठी किती केविलवाणी झाली आहे ते समजते. MP Sunil Tatkare on visit to Guhagar
आमदार भास्कर जाधव आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत. मविआ भक्कम करण्याचे काम आम्ही दोघेही करत आहोत. फक्त अपेक्षा आहे की त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांनाही समजुन घ्यावे.
अनेक योजनातून मतदान संघात निधी
लोकसभा सदस्य म्हणून खासदार निधीतून आणि केंद्राच्या पर्यटन, सागरमाला, भारतमाला, जलसंपदा, मत्ससंपदा योजनेतून काही कामे सुचवली आहेत. मध्यंतरी कोविडमुळे खासदार निधी थांबवला होता. यातील काही कामे केंद्राने राज्याकडे पाठवली. त्यामुळे नेमकी किती कामे पुढे सरकली हे आज माहिती नाही. मार्च महिन्यात त्याची तपशीलवार माहिती मिळेल. खासदार निधीला मर्यादा आहेत परंतू महाविकास आघाडीचे सरकार असताना यांच्यामार्फत ग्रामविकास खात्यातून, जिल्हा नियोजनातून अनेक कामे मंजुर झाली आहेत. प्रस्तावित केली आहेत. MP Sunil Tatkare on visit to Guhagar