खासदार सुनील तटकरे गुहागर विजापूर महामार्गाच्या कामावर नाराज
गुहागर, ता. 08 : गुहागर विजापूर महामार्गाचे काम अजुनही रखडलेले आहे. ठेकेदार योग्य पध्दतीने काम करत नाही. यामुळे मी सुध्दा निराश झालो आहे. संयमाचा अंत झाला आहे. या महामार्गाच्या कामाबाबत केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे तक्रार करणार आहे. आजपर्यंतच्या राजकीय जीवनात लेखी तक्रार कधीही केली नव्हती. या विषयाची गंभीर तक्रार करणार आहे. असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले. ते गुहागरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. MP Sunil Tatkare Guhagar unhappy with Bijapur highway work
आज गुहागर मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेल्या खासदार सुनील तटकरे यांनी शासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार तटकरे म्हणाले की, आजच्या आढावा बैठकीत जलजीवन मिशन, गुहागर शहरातील पाणी योजना, गुहागर विजापूर महामार्गाच्या कामातील अडचणी, माणगाव अपघातातील 10 जणांच्या दुर्दैवी मृतांच्या नातेवाईकांना मदत मिळवून देणे, अन्य प्रलंबीत प्रश्र्न याबाबत चौकशी केली. अधिकाऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. काही अडचणींबाबत थेट वरिष्ठांशी चर्चा केली आहे. पुढील 15 दिवसांत यातील अनेक विषय मार्गी लागतील. महामार्गाच्या आठ गावातील भु संपादनाची प्रक्रिया पूर्ण करुन संबंधित जमीन मालकांना मोबदला देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यास प्रांतांना आज सांगितले आहे. कामाचा दर्जा आणि कामाची पूर्तता याबाबत या महामार्गाचे प्रमुख अधिकाऱ्यांनी कामाची पहाणी करण्याची विनंती केली आहे. MP Sunil Tatkare Guhagar unhappy with Bijapur highway work
आरजीपीपीएलची वीज महाग पडत असल्याने कोणीही वीज खरेदी करण्यास तयार नाही. तरीही हा प्रकल्प सुरु राहीला पाहीजे अशी माझी भुमिका आहे. निरामय हॉस्पिटल देखील पुन्हा सुरु व्हावे यासाठी राज्य सरकारने लक्ष घातले पाहीजे यासाठी प्रयत्न करेन. पर्यटन मंत्री गिरीश महाजन सध्या कोकणाती पर्यटन धोरणाच आढावा घेत आहेत. बीच शॅक पॉलीसीला सीआरझेडची फार मोठी अडचण येत नाही. त्यामुळे ही पॉलीस लवकरात लवकर आणण्याबाबत त्यांना विनंती केली आहे. कोकणात लागणारे वणवे ही गंभीर गोष्ट आहे. वन्य प्राण्यांकडून शेतीचे होणारे नुकसान आणि वणव्यामुळे फळबागायतीचे होणारे नुकसान याबाबत राज्य सरकारला धोरण निश्चित करावे लागेल. पीक विम्यामध्ये या नुकसानीचा अंतर्भाव केला तर थोडी बहुत मदत सरकारकडून सामान्य शेतकऱ्याला मिळेल. MP Sunil Tatkare Guhagar unhappy with Bijapur highway work
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, उपाध्यक्ष डॉ. अनिल जोशी, तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे आदी उपस्थित होते.