• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उत्खननाविरोधात वरवेली ग्रामस्थांचे ५ जूनला आंदोलन

by Ganesh Dhanawade
May 26, 2023
in Guhagar
144 1
0
Movement of Varveli villagers on 5th June
282
SHARES
806
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

उत्खनन बंद करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन, नुकसानभरपाईचे आश्वासनही हवेत

गुहागर, ता. 26  : तालुक्यातील ग्रामपंचायत वरवेली कार्यक्षेत्रात सुरु असणाऱ्या दगड उत्खननाविरोधात येथील ग्रामस्थांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. या उत्खननामुळे मानवी वस्त्यांना धोका निर्माण झाला असून नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नसल्याचा ग्रामसभेत ठराव करुन ५ जूनला आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. Movement of Varveli villagers on 5th June

वरवेली येथील काळा दगड उत्खननामुळे गावातील ९० घरांचे अतोनात नुकसान झाले असून पावसाळ्या अगोदर या नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी याची मागणी करण्यात आली आहे. उत्खननात मोठ्या प्रमाणात सुरुंग लावल्याने येथील स्थानिकांच्या घरांना, मंदिर व इतर बांधकामे यांना तडे जाणे, विहिरी व बोअरवेलचे पाणी कमी होणे, ध्वनी प्रदूषण, दगड वाहतूक धुळीमुळे आंबा-काजू व इतर फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत उत्खनन कायमस्वरूपी बंद करण्याबाबत व आंदोलन करण्याबाबत एकमुखी ठराव करण्यात आला. Movement of Varveli villagers on 5th June

याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, तहसीलदार, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रत्नागिरी यांना निवेदन देण्यात आले आहे. यापूर्वी संबंधीत यंत्रणेकडून आंदोलनासारख्या मार्गाचा अवलंब करू नये असे ग्रा. पं. ला कळविण्यात आले होते. त्या पत्रानुसार संबंधित यंत्रणेकडून कोणती व कशा पद्धतीने कार्यवाही केली. Movement of Varveli villagers on 5th June

याबाबतचा अहवाल ग्रामपंचायतला अद्याप सादर केलेला नाही. सदर अहवाल मिळावा, नुकसानग्रस्त घरे व इतर बांधकामे यांचे पंचनामे महसूल खात्याकडून करूनही अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. तसेच तडे गेलेल्या घरांना धोका निर्माण झालेला असून पावसाळ्यात जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. असे असताना सदर काळा दगड उत्खननाचे काम पुन्हा सुरू झालेले असून येथील स्थानिकांचा व ग्रामपंचायतचा सदर उत्खनन करण्यास तीव्र विरोध असून सदर उत्खनन बंद न झाल्यास दि. ५ जून रोजी येथील ग्रामस्थ तहसील कार्यालय गुहागर येथे आंदोलन करण्यात येणार आहे. Movement of Varveli villagers on 5th June

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMovement of Varveli villagers on 5th JuneNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share113SendTweet71
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.