• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 November 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्ह्यात सर्वाधिक १.७१ लाख हेक्टर जमीन पडीक

by Mayuresh Patnakar
November 28, 2026
in Ratnagiri
22 0
0
Most of the land in the district is fallow
43
SHARES
123
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जमीन लागवडीबाहेर राहणे चिंतेचा विषय

गुहागर, ता. 28 : शेतीसाठी मजुरांची कमतरता, वाढता उत्पादन खर्च आणि शेतीतील घटता आर्थिक परतावा यामुळे कोकणातील मोठे क्षेत्र लागवडीबाहेर राहिले आहे. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी करून ती पडीक ठेवणाऱ्या जमीनधारकांनी पुढील तीन ते पाच वर्षांत शेती उत्पादन सुरू करावे, अशी भूमिका शासनाने घेतली आहे. Most of the land in the district is fallow

जमीन वापरविषयक महाराष्ट्र शासनाच्या २०२३-२४ च्या आकडेवारीनुसार कोकण विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये चालू पड आणि इतर पड मिळून तीन लाख ७४ हजार २०० हेक्टर जमीन पडीक आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ७१हजार ३०० हेक्टर तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ लाख १५ हजार ७०० हेक्टर क्षेत्र लागवडीबाहेर आहे. विशेष म्हणजे, या दोन जिल्ह्यांतील पडीक क्षेत्र कोकणातील एकूण पडीक जमिनीच्या सुमारे ७७ टक्के आहे. रायगड जिल्ह्यात ४१ हजार ६०० हेक्टर, पालघरमध्ये १३ हजार ९०० हेक्टर आणि ठाणे जिल्ह्यात १३ हजार ७०० हेक्टर जमीन पडीक असल्याची नोंद आहे. कोकणातीलभातशेती, आंबा-काजू बागायती आणि भौगोलिक परिस्थिती पाहता एवढ्या मोठ्या प्रमाणावर जमीन लागवडीबाहेर राहणे चिंतेचा विषय ठरत आहे. Most of the land in the district is fallow

दरम्यान, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी करून ती पडीक ठेवणाऱ्यांनी तीन ते पाच वर्षांत शेती उत्पादन सुरू करावे, अशी भूमिका मांडली आहे; मात्र, स्वतःची शेती करणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी शासन ताब्यात घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शासनाची ही भूमिका नेमकी कोणत्या प्रकारच्या जमिनी आणि जमीनधारकांपुरती मर्यादित राहणार, याबाबत उत्सुकता आहे. लागवड न करण्यामागील अडचणी कोकणातील पडीक जमिनींचा प्रश्न केवळ जमीनधारकांपुरता मर्यादित नाही. शेतीसाठी मजुरांची टंचाई, वाढता उत्पादन खर्च, वन्यप्राण्यांचा उपद्रव, सिंचनाच्या मर्यादा, बाजारपेठेतील अनिश्चितता आणि तरुणपिढीचे शेतीकडे झालेले दुर्लक्ष ही देखील त्यामागील महत्त्वाची कारणे आहेत. Most of the land in the district is fallow

त्यामुळे पडीक जमीन पुन्हा लागवडीखाली आणण्यासाठी शासनाला या अडचणींचाही विचार करावा लागणार आहे. ठोस कृती आराखड्याची गरज कोकणातील पडीक जमिनींचा योग्य वापर करून शेती उत्पादन वाढवण्याची मोठी संधी आहे; मात्र, केवळ आदेश किंवा मुदती जाहीर करून हा प्रश्न सुटणार नाही. जमिनीचा प्रकार, मालकी हक्क, पाण्याची उपलब्धता आणि स्थानिक शेतीची परिस्थिती विचारात घेऊन शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा देणारा ठोस कृती आराखडा शासनाने तयार करणे गरजेचे आहे. Most of the land in the district is fallow

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMost of the land in the district is fallowNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share17SendTweet11
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.