यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, गुहागर, संगमेश्वर, लांजातील सर्वाधिक लाभार्थी
गुहागर, ता. 14 : विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ५५ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून मान्यता मिळाली आहे. यामध्ये सर्वाधिक लाभार्थी गुहागर, संगमेश्वर व लांजा तालुक्यातील आहेत. Most beneficiaries in Gharkul scheme in district
या योजनेतंर्गत लाभार्थ्यांच्या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजना रत्नागिरी जिल्हास्तरीय समितीने १३ मार्च २०२३ मध्ये झालेल्या बैठकीत मंजूर करुन ते प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे पाठवले होते. या प्रस्तावाच्या अनुषंगाने या योजनेतंर्गत 2023-24 करीता जिल्ह्यातील प्रति लाभार्थी 1.20 लक्ष प्रमाणे 66 लक्ष व 4 टक्के प्रशासकीय निधी (प्रति घरकुल 4800 प्रमाणे) 2 लक्ष 64 हजार असा एकूण 68 लक्ष 64 हजार इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. Most beneficiaries in Gharkul scheme in district
या लाभार्थ्यांमध्ये दापोली तालुक्यातील ओणनवसे येथील 5, देर्दे येथील 9, गुहागर तालुक्यातील साखरी खुर्द 7, मुंढर 2, अडूर नागझरी -1, विसापूर -1, साखरीआगर-2, संगमेश्वर तालुक्यातील पाटगाव-2, मुचरी -1, कनकाडी -2, चाफवली-1, तुळसणी-1, हातीव-मुरादपूर-2, मुचरी-1, वांझोळे -2, आसुर्डे-1, वाशी -1, लांजा तालुक्यातील गवाणे-2, शिपोशी-4, केळवली-2, चांदिवणे-1, सालपे-2, चिपळूण तालुक्यातील उमरोली-1, केतकी भोईवाडी-1 येथील लाभार्थ्यांचा समावेश आहे. Most beneficiaries in Gharkul scheme in district