शृंगारतळी, गुहागर शहराच्या वेशीवर कचऱ्याचे सम्राज; सार्वजनिक आरोग्य धोक्यात
गुहागर, ता. 04 : प्रत्येक गाव, त्यानंतर तालुका, राज्य हागणदारी मुक्त झाले पाहिजे म्हणून अभियान राबविण्यात आले. त्यानंतर घनकचरा व्यवस्थापनावर गेल्या वर्षभरापासून पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासन काम पाहत आहे. उघडयावर कचरा टाकू नये, कायदेशीर कारवाई केली जाईल अशा कितीही ध्वनीप्रक्षेपण झाले. तरी आज गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर गुहागर शहर व शृंगारतळी गावांमध्ये वेशीबाहेर रस्त्यावर उघडयावर कचऱ्याचे साम्राज्य पहावयास मिळत आहे. या टाकलेल्या कचऱ्यामध्ये सर्वाधिक प्लास्टीक पिशव्या कपड्यांचे तुकडे यांचा यामध्ये समावेश असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. Morniwok’s fund for throwing garbage
शासनाने घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत प्रत्येक व्यक्तीवर ३४० रूपये निधी खर्च करण्याचे ठरवीले आहे. स्वच्छता व पाण्यासाठी १५ वा वित्त आयोगातून ६० टक्के निधी खर्ची पाडावयाचा आहे. यासाठी घनकचरा व्यवस्थापनामध्ये जिल्हास्तरावरून निळाव पॉलिकॅप व ऑल इंडिया या दोन कंपन्यांना ठेका देण्यात आला आहे. प्रत्येक गावाचा घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत डीपीआर तयार करून सार्वजनिक शोष खड्डे, वैयक्तिक शोषखड्डे, सार्वजनिक कुंडया, कचरा संकलन इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या सायकलही दिली आहे. पोस्टर व बॅनरबाजीने स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे. स्पिकरवरून कचरा उघडयावर टाकू नये, कारवाई केली जाईल असा संदेशही पोहच होत आहे. परंतु सोशल मिडीयावर झटपट माहीती मिळवून आपली बुद्धीमत्ता दाखविणारा सुजाण नागरीकाला मात्र अजूनही उघडयावर कचरा टाकू नये हे अंगवळणी पडत नाही. सुरूवातीच्या काळात उघडयावर सौचास बसू नये म्हणून हगणदारमुक्त अभियान राबवीले गेले. तर आता उघडयावर कचरा टाकू नये म्हणून घनकचरा आभियान राबताना दिसून येत आहे. Morniwok’s fund for throwing garbage


वेशीवरच्या कचऱ्याने गुहागर, शृंगारतळी, मार्गताम्हाणे, आबलोली या गावांना डोकेदुखी ठरली आहे. बाजारपेठेत तेथील ग्रामपंचायत प्रशासन स्वच्छतेसाठी राबत आहे. मात्र तेच व्यवसायीक खुलेआम वेशीबाहेर कचरा फेकताना आढळून येतात. तर गुहागर शहरात काहींनी रात्रीचे प्लास्टिक पिशव्यांमध्ये साठवून ठेवलेला कचरा पहाटेच्या मॉर्निंगवॉकच्या वेळी वेशीबाहेर टाकण्याची नामी शक्कल लढवीली आहे. यामुळे मॉर्निंग वॉक हे कचरा टाकण्याचा फंडा ठरत आहे. आज ज्या वेशीबाहेर कचरा टाकत आहेत. त्या वेशीपर्यंत केलेले मॉर्निंग वॉक पुढील काळात आरोग्यास धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. Morniwok’s fund for throwing garbage
तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गाव पातळीवर कचराकुंड्यांचेही वाटप ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे. आपल्या घरातील कचरा आपणच जमा करून त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही नागरिकांची असते. मात्र, काहीजण या जबाबदारीला गांभीर्याने न घेता कचऱ्याने भरलेली पिशवी रस्त्याने जाताना त्याच्या कडेला किंवा नदी-नाल्यांमध्ये टाकतात. बहुसंख्य ग्रामपंचायतींना कचरा संकलित करणारी घंटागाडी नसते. त्यामुळे बाजारपेठांमधील कचरा संकलित करण्याचा विषय सहसा येत नाही. मात्र, संबंधित गावांच्या बाजारपेठेतील मुख्यत्वे करुन भाजी व्यापारी, मासळी, मटण विक्रेते दिवसभराची घाण आणून गावच्या वेशीवर रस्त्यालगतच आणून टाकतात. दररोज एकाच जागेवर कचरा टाकण्याची सवय झाल्याने काही ठिकाणे कचऱ्याचा डेपोच बनले आहे. Morniwok’s fund for throwing garbage