वेळंब उपसरपंच श्रीकांत मोरे यांचे महावितरणला निवेदन
गुहागर, ता. 20 : तालुक्यातील वेळंब येथील उपसरपंच श्रीकांत मोरे यांनी प्रजासत्ताकदिनी महावितरण कार्यालयासमोर उपोषण बसण्याचा इशारा दिला आहे. याबाबत निवेदन गुहागर महावितरण कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे. More’s statement to Maha distribution
गुहागर तालुक्यातील वेळंब येथील धोकादायक विद्युत खांब गेली अनेक वर्षे महावितरणकडे वारंवार पाठपुरावा करूनही बदलण्यात आलेले नाहीत. महावितरणकडून होत असलेल्या या दुर्लक्षामुळे धोकादायक विद्युत खांब असलेल्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महावितरणच्या या डोळेझाकपणावर आवाज उठवण्यासाठी प्रजासत्ताकदिनी गुहागर महावितरण कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा वेळंब उपसरपंच श्रीकांत मोरे यांनी दिला आहे. याबाबत निवेदन गुहागर महावितरण कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे. More’s statement to Maha distribution

या निवेदनात वेळंब गावातील धोकादायक असलेले विद्युत खांब बदलण्यासाठी दिनांक 2 एप्रिल 2015 व दिनांक 9 ऑगस्ट 2021 असा दोन वेळा लेखी पत्रव्यवहार केला होता. तर काही वेळा प्रत्यक्ष भेटूनही याबाबत विनंती केली होती. यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी हे धोकादायक विद्युत खांब आहेत त्याबाबतही माहिती दिली होती. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाईलाजाने 26 जानेवारी रोजी गुहागर महावितरण कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. More’s statement to Maha distribution
