• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 October 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

यावर्षी मान्सून वेळेआधी परतणार

by Ganesh Dhanawade
September 1, 2022
in Bharat
25 0
0
Monsoon will return early this year
49
SHARES
140
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नागपूर, ता.01 : दरवर्षीपेक्षा यावर्षी लवकर म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होईल. आणि ३० सप्टेंबरपर्यंत तो महाराष्ट्रातून निघून जाईल. असा हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात थंडीही सुरू होईल, असा अंदाज आहे. Monsoon will return early this year

तज्ज्ञांच्या मते, गेल्या पाच-सहा वर्षांपासून पर्यावरणाचे चक्र बदलले आहे. मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने परतीचा काळही लांबणीवर गेला. गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाऊस होता आणि शेवटच्या आठवड्यात थंडीची चाहूल लागली होती. दरवर्षी साधारणत: १८ ते २० सप्टेंबरदरम्यान परतीचा प्रवास सुरू होतो. मात्र, यावर्षी मान्सूनचे आगमन लवकर झाले होते. जूनमध्ये कमतरता असली तरी जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. Monsoon will return early this year

बदललेल्या हवामान चक्रानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस परतीचा प्रवास सुरू करेल. ज्या वेगाने बरसला, त्या वेगाने निघून जाईल. ३० सप्टेंबरपर्यंत तो गेलेला असेल. यावर्षी ज्याप्रमाणे उन्हाळ्यात उष्ण लहरी व पावसाने सतावले, त्याप्रमाणे थंडीही सतावेल. हिवाळ्याचा तडाखा तीव्रपणे जाणवेल असे हवामानतज्ज्ञ सुरेश चोपणे यांनी सांगितले. Monsoon will return early this year

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMonsoon will return early this yearNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share20SendTweet12
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.