यंदा देशात मान्सून उशीरा दाखल होणार
दिल्ली, ता. 06 : देशात यंदा मान्सून उशीरा दाखल होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत अरबी समुद्राच्या दक्षिण किनार्यावर चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे अद्याप मान्सून केरळातच दाखल झालेला नाही. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून ४ जूनपर्यंत केरळमध्ये पोहोचेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. पण मान्सूनचा मुहूर्त हुकला आहे. Monsoon will enter the country late this year


मान्सून साधारणपणे १ जूनच्या सुमारास केरळच्या किनारपट्टीवर दाखल होतो. 26 मे रोजी हवामान खात्याने सांगितले होते की, यंदा मान्सून 4 जूनपर्यंत केरळच्या किनारपट्टीवर पोहोचू शकेल. मात्र चक्रीवादळामुळे आता यंदा मान्सून उशिरा दाखल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सोमा सेनरॉय यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, मान्सून केरळमध्ये दाखल होणार त्याचवेळी अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे मान्सूनचा प्रवाह थोडासा विस्कळीत झाला आहे. केरळमध्ये मान्सून केव्हा दाखल होईल, तोपर्यंत आम्ही याबाबत कोणताही अहवाल देऊ शकत नाही. मान्सून केरळच्या किनारपट्टीवर पोहोचण्यास उशीर होईल का? या प्रश्नाच्या उत्तरात डॉ. सोमा सेनरॉय म्हणतात, होय, यावेळी मान्सूनला थोडा विलंब होऊ शकतो. Monsoon will enter the country late this year


आम्ही ४ जूनची तारीख पार केली आहे. दुसरीकडे, पूर्व भारतातील राज्यांमध्ये विशेषतः बिहार, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये उष्णतेचे संकट अधिक गडद होत आहे. आगामी काळात पूर्व भारतातील राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचे संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ नरेश कुमार यांनी एनडीटिव्हीला सांगितले, जेव्हा तापमान सरासरी 4.5 अंश सेल्सिअसने ओलांडते, तेव्हा ती उष्णतेची लाट मानली जाते. जर तापमान सरासरी 6.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल, तर ते गंभीर मानले जाते. बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट सुरू आहे. Monsoon will enter the country late this year
आम्ही बिहार आणि पश्चिम बंगालसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यावर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान देशात मान्सूनचा पाऊस सामान्य होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. देशातील बहुतांश भागात मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज आहे. तथापि, उत्तर-पश्चिम भारतात यावर्षी मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी असू शकतो. Monsoon will enter the country late this year