महाराष्ट्रात लवकरच दाखल होणार
गुहागर, ता. 08 : अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याने मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती दिली आहे. जवळपास एक आठवडा उशीराने मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. मान्सूनच्या आगमनामुळे देशभरातील जनतेसोबतच शेतकऱ्यांना आनंद झाला आहे. Monsoon has finally arrived in Kerala


हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. केरळच्या अनेक भागांमध्ये आज सकाळपासून पावसाला सुरूवात झाली. दरवर्षी मान्सून 1 जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होत असतो. पण यावर्षी मान्सूनचे आगमन होण्यासाठी तब्बल एक आठड्याचा कालावधी लागला. मान्सूनने केरळमध्ये दाखल होण्यासाठी 8 जूनची तारीख गाठली. आता हळूहळू मान्सून पुढे सरकरत सक्रीय होईल. Monsoon has finally arrived in Kerala


मान्सून आज केरळमध्ये दाखल झाला असून तो लवकरच महाराष्ट्रात दाखल होईल. मान्सून तळकोकणात 16 जून किंवा त्यानंतरच दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सूनच्या आगमनामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होतोय याची सर्वजण वाट पाहत आहेत. दरम्यान, यावर्षी बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास लांबला. या चक्रीवादळाच्या परिणामामुळेच मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी उशीर होत असल्याचे हवामान खात्याने सांगितले होते. आता मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांना आनंद झाला आहे. आता शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाला सुरुवात केली आहे. Monsoon has finally arrived in Kerala