गुहागर तालुका भंडारी समाजाच्या मान्यवरांचा सन्मान सोहळा
गुहागर, ता. 19 : गुहागर तालुका भंडारी समाजाच्या वतीने सन- 2026 मधील गुणवंत विद्यार्थीव मान्यवरांचा सन्मान सोहळा दि. 16/08/2026 रोजी येथील कै. इंदिरा वासुदेव शेटे सभागृह भंडारी भवन गुहागर येथे संपन्न झाला. या सन्मान सोहळ्यात बाग गावचे खोत व भंडारी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते मोहन आत्माराम बागकर यांना, स्व. सदानंद आरेकर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ, भंडारी भुषण पुरस्कार – 2026 ने गौरवण्यात आले. Mohan Bagkar conferred with Bhandari Bhushan Award
मोहन बागकर हे 1981 पासुन बाग ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष व गावचे खोत म्हणून आजतागायत कार्यरत आहेत. गुहागर ग्रामपंचायतीच्या काळखंडात त्यांनी पाच वर्षे सदस्य म्हणूनही बाग गावाचे सर्वांगिण विकासाला योगदान दिले आहे. तसेच गुहागर तालुका भंडारी समाज व किल्ले भंडारी समाज मुंबई या दोन्ही संस्थाचे अनेक वर्षे पदाधिकारी म्हणूनही भंडारी समाजाचे एकत्रिकरणात व उत्क्रांतीकरता योगदान दिले आहे. त्यांचे या सामाजिक योगदानाचा विचार करुन त्यांना यावर्षीचा भंडारी भुषण- 2026 ने सन्मानीत करण्यात आले. Mohan Bagkar conferred with Bhandari Bhushan Award
या सन्मान सोहळ्याला भंडारी समाजाचे अध्यक्ष नवनीत ठाकूर, उपाध्यक्ष मुरलीधर बागकर, पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, ज्ञानी अध्यक्ष अमोल वराडकर, नेत्रा ठाकुर, दिपक कनगुटकर, सुजाता बागकर बागय, अमोल गोयथळे, निलेश मोरे, तुषार सुर्वे, निलेश गोयथळे व इतर भंडारी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. Mohan Bagkar conferred with Bhandari Bhushan Award
