• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 May 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भुसंपादनाची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण होणार

by Mayuresh Patnakar
August 23, 2023
in Guhagar
281 3
1
Modkaagar road issue solved
552
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

बांधकाम मंत्री चव्हाण, मोडकाआगरचा प्रश्र्नही निकाली

गुहागर, ता. 23 : गुहागरमधील शुन्य कि.मी. पासून महामार्गाच्या भुसंपादनासाठी सुनावण्यांची प्रक्रिया 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करुन संबंधित जागामालकांना मोबदला देण्यास सुरवात करावी. अशा स्पष्ट सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी काल अभियंत्यांना दिल्या. ते मंत्रालयात महामार्गासंदर्भात घेतलेल्या बैठकीत बोलत होते. Modkaagar road issue solved

मंगळवारी, ता. 22 ऑगस्टला गुहागर विजापूर महामार्गासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीमध्ये गुहागर शहरातील महामार्गाच्या प्रारंभ बिंदुपासून मार्गताम्हाने पर्यंतच्या जागांचे भुसंपादन, प्रारंभ बिंदू ते शासकीय विश्रामगृहादरम्यान पडलेले खड्डे, मोडकाआगर पुलाजवळील रस्ता, शृंगारतळीतील धोकादायक रोड, काजळी बसथांब्याजवळील अपुर्ण काम, चिखलीतील अर्धवट राहीलेले काँक्रिटीकरण, बस थांब्यांवरील तोडलेल्या पिकप शेडची उभारणी, महामार्गाच्या बांधकामातील त्रुटी आदी विषयांची चर्चा झाली. मोडकाआगर पुलासंदर्भात न्यायालयाने शासनाच्या बाजुने निकाल दिला आहे. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर धरण पुलापासून भराव घालुन मोडकाआगर चौकापर्यंतचा रस्ता करण्यात येईल. काजळी येथील रस्त्याचे काम तेथे मोरीचे काम अपूर्ण असल्याने राहीले आहे. श्रृंगारतळीत पालपेणे फाट्याजवळ नव्या पुल बांधावा लागणार आहे. अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. Modkaagar road issue solved

मात्र मोडकाआगरचा पुलाचा विषय वगळता भुसंपादनाच्या विषयासह उर्वरित कामे  गेल्या चार वर्षात का मार्गी लागली नाहीत. असा प्रश्र्न ग्रामस्थांनी उपस्थित केला. त्यावर अधिकारी समाधानकारक उत्तर देवू शकले नाही. त्यामुळे संतापलेल्या बांधकाम मंत्री यांनी,  यापुढे कोणतीही कारणे चालणार नाहीत. ग्रामस्थांनी सांगितलेल्या प्रत्येक समस्येचे निराकरण झालेच पाहिजे. खड्डे भरण्याचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होवून त्याचा अहवाल माझ्यापर्यंत आला पाहिजे. अशी ताकीद अधिकाऱ्यांना दिली. भुसंपादनाचा रखडलेला कार्यालयीन विषय लागलीच पूर्ण करुन 15 सप्टेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण करा.  संबंधित जागामालकांची देय रक्कम तातडीने द्या. अशी ताकीदच मंत्री चव्हाण यांनी दिले. कालच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी योग्य पध्दतीने होत आहे की नाही. याचा पाठपुरावा दिपक परचुरे आणि सिध्दीविनायक जाधव यांनी करावा. असेही मंत्रालयात झालेल्या बैठकीत ठरले. Modkaagar road issue solved

गेली 3 वर्ष महामार्गाच्या कामांबाबत सातत्याने अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणारे दिपक परचुरे म्हणाले की, आजची मिटींग समाधानकारक झाली. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. 30 ऑगस्टपर्यंत अधिकाऱ्यांना महामार्गावरील सदोष काम झालेली ठिकाणे दाखवायची आहेत. प्रारंभ बिंदू पासून मार्गताम्हानेपर्यंतच्या रस्त्यावरील सर्व खड्डे भरण्याचे काम गणेशोत्सवापूर्वी करुन त्याचा अहवाल थेट मंत्री चव्हाण यांना द्यायचा आहे.  महामार्गाचे बांधकाम करताना काही ठिकाणी समतल स्थितीत झालेले नाही. त्यामुळे वाहने उडतात. या ठिकाणांची दुरुस्ती देखील ठेकेदाराकडून करुन घेण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना मंत्री चव्हाण यांनी केल्या आहेत. Modkaagar road issue solved

या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सचिव, राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, जिल्हा भूसंपादन अधिकारी, उपविभागीय अधिका-यांसह सर्व प्रमुख अधिकारी, गुहागरमधुन दिपक परचुरे, उमेश भोसले, अमरदीप परचुरे, सचिन खरे, सिद्धीविनायक जाधव यांच्यासह माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे, तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, भाजप चिपळुण तालुकाध्यक्ष अजित थरवळ, भाजप खेड तालुकाध्यक्ष किशोर आंब्रे आदी उपस्थित होते. Modkaagar road issue solved

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMinister Ravindra ChavanModkaagar road issue solvedNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामंत्री रवींद्र चव्हाणमराठी बातम्यालोकल न्युज
Share221SendTweet138
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.