रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपाला मिळवायचा आहे विजय
रत्नागिरी, ता. 03 : मोदी ॲट नाईन अभियानाची रत्नागिरी शहर, तालुक्याची बैठक शनिवारी भाजपा जिल्हा कार्यालयात झाली. यावेळी सहसंयोजक प्रमोद जठार यांच्यासमवेत भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, ॲड. बाबा परुळेकर, सचिन वहाळकर, माजी आमदार बाळ माने, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, सरचिटणीस उमेश कुळकर्णी, शहराध्यक्ष सचिन करमरकर आदी प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विजय मिळवायचा या उद्दिष्टाने व केंद्राच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. Modi @ 9 Ratnagiri Executive announced

यावेळी ॲड. दीपक पटवर्धन यांनी प्रास्ताविकामध्ये कोणत्याही स्थितीत लोकसभा मतदारसंघ भाजपाला जिंकायचा आहे, सर्व विधानसभा मतदारसंघातही भाजपचे उमेदवार विजयी होतील, यासाठी व्यूहरचना करण्यात येत आहे. देशात व राज्यात भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे डबल इंजिनद्वारे विकास योजना राबवल्या जात आहेत. कार्यकर्त्यांच्या कर्तुत्वाचे चीज झाले पाहिजे, असे सांगितले. Modi @ 9 Ratnagiri Executive announced
माजी आमदार बाळ माने यांनी सहसंयोजक प्रमोद जठार यांना भाजपाची शक्ती वाढणार आहे व आपल्याला एकत्रित काम केल्यामुळे यश मिळेल, असे सांगितले. विधानसभा संयोजक विजय सालीम यांनीही तालुक्यात कानाकोपऱ्यात भाजपाची ताकद वाढत असल्याचे सांगितले. उमेश कुळकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. Modi @ 9 Ratnagiri Executive announced

या वेळी संयोजक सचिन वहाळकर यांनी विस्तृत कार्यकारिणी जाहीर केली. विशाल रॅली संयोजक- सचिन करमरकर, सहसंयोजक अमर रहाटे, ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन संयोजक विजय बेहेरे, सहसंयोजक राजन फाळके, बुद्धिवंतांचे संमेलन संयोजक राजन पटवर्धन, सहसंयोजक सुजय लेले, व्यापार संमेलन संयोजक- जयप्रकाश पाखरे, सहसंयोजक दादा ढेकणे, लाभार्थी संमेलन संयोजक श्रीकांत मांडवकर, सहसंयोजक सौ. पल्लवी पाटील, संयुक्त मोर्चा संमेलन संयोजक लीलाधर भडकमकर, सहसंयोजक संदीप रसाळ, बुथस्तरीय संमेलन संयोजक संदीप सुर्वे, सहसंयोजक मुकेश भावे, विकासतीर्थ संयोजक मुकुंद जोशी, सहसंयोजक अनंत जाधव, योग दिवस संयोजक ओंकार फडके, सहसंयोजक सौ. सोनाली आंबेरकर, घरोघरी संपर्क संयोजक- भाई जठार, सहसंयोजक प्रशांत डिंगणकर, सोशल मीडिया संयोजक ॲड . नीलेश आखाडे, सहसंयोजक प्रवीण देसाई, संपर्कातून समर्थन संयोजक बाळशेठ जोग, सहसंयोजक राजू भाटलेकर. प्रभागप्रमुख- नितीन जाधव, रत्नाकर जोशी, उमेश कुळकर्णी, रफिक मुकादम, शैलेंद्र बेर्डे, सौ. प्राजक्ता रुमडे, प्रमोद खेडेकर, अमेय मसुरकर, राजू तोडणकर, शंकर शिंदे, मुन्ना मयेकर, मन्सूर मुकादम, सौ. संपदा तळेकर, केदार बोरकर, रामा शेलटकर. Modi @ 9 Ratnagiri Executive announced

रत्नागिरी विधानसभा संयोजक विजय सालीम, सहसंयोजक सुशांत चवंडे, जिल्हा परिषद संयोजक- प्रसाद पाटील, किसन घाणेकर, उमेश कुळकर्णी, राजेंद्र शिवलकर, ॲड . महेंद्र मांडवकर, सौ. ऐश्वर्या जठार, राजेश सावंत, अभय दळी, नीलेश लाड, सुधीर शिंदे. पंचायत समिती संयोजक- मिलिंद वैद्य, नंदकुमार बेंद्रे, सदाशिव पाचकुडे, वसंत रेवाळे, उमेश देसाई, सचिन दुर्गवळी, नीलेश लोंढे, स्नेहा चव्हाण, तनया शिवलकर, विनय मुकादम, संजय निवळकर, संकेत कदम, गजानन धनावडे, गुरु गोविलकर, संतोष बोरकर, प्रवीण पाथरे, संजय पाथरे आणि गितेश दामले. शहर संयोजक- सचिन करमरकर व संदीप सुर्वे. Modi @ 9 Ratnagiri Executive announced
