विद्यार्थ्यानी अंगभूत कौशल्याचा शोध महाविद्यालयातूनच घ्यावा- संतोष वरंडे
गुहागर, ता. 03 : पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा वाणिज्य विभाग आणि लायन्स क्लब गुहागर यांच्या माध्यमातून झालेल्या मॉक इंटरव्यू स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी संपन्न झाला. हा सोहळा विमा क्षेत्रा मध्ये सलग तेरा वर्षे एमडीआरटीचा पुरस्कार मिळवणारे श्री संतोष वरंडे यांच्या हस्ते पार पडला. Mock Interview Competition
वरंडे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये करिअर करावयाचे असेल तर आपल्या व्यक्तिमत्व विकास कसा करावा याची माहिती देऊन यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक राहून विचार केला तर कठीण असणाऱ्या गोष्टी आयुष्यामध्ये सहज साध्य करू शकता हे स्पष्ट केले. महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन केले गेले. या स्पर्धेमध्ये एकूण 110 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी मुलाखत देण्यासाठी त्यांना तीन विषय देण्यात आले होते. त्यापैकी त्यांनी एका पदाची निवड करावयाची होती. स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्लार्क, डी मार्टचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आणि भारतीय जीवन विमा महामंडळाचे विमा एजंट अशी पदे देण्यात आली होती. Mock Interview Competition
मुलाखत घेण्यासाठी प्रत्येक पदासाठी एक पॅनल तयार केले होते. बँक पदासाठी बँक ऑफ इंडियाचे निवृत्त व्यवस्थापक श्री यशवंत बर्वे आणि एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक श्री राजेंद्र चव्हाण, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदासाठी नामवंत उद्योजक श्री शामकांत खातु आणि विनोद पटेल तसेच विमा प्रतिनिधी साठी श्री संतोष वरंडे आणि उद्योजक श्री सत्यवान घाडे यांनी मुलाखती घेतल्या. या मुलाखती रविवार दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या मध्ये मुलाखतीचे कौशल्य विकसित व्हावे, त्यांना मुलाखतीचा अनुभव व्हावा, मुलाखती संदर्भात आत्मविश्वास तयार व्हावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयातर्फे करण्यात येते. Mock Interview Competition
या स्पर्धेसाठी एकूण 22 हजार रुपयांचे रोख पारितोषिक, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात आले. प्रथम क्रमांकास प्रत्येक विभागातील पदासाठी तीन हजार रुपये, दोन हजार रुपये, एक हजार रुपये तसेच उत्तेजनार्थ पाचशे रुपये देण्यात आले. उत्तेजनार्थ म्हणून तीन विभागात पाच विद्यार्थ्यांना बक्षिसे देखील देण्यात आली. सदर स्पर्धेसाठी प्रा. सुभाष खोत यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त 18 हजार रुपये तसेच लायन्स क्लब गुहागर तर्फे चार हजार रुपये आणि श्री विनोद पटेल यांच्यामार्फत सर्व ट्रॉफी देण्यात आल्या. Mock Interview Competition
बँक क्लार्क या मुलाखतीमध्ये श्री निखिल टानकर, आदित्य पालकर, प्राजक्ता रावणंग यांचा अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक तसेच कु. वसुधा भागडे हिला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह बाबत कु. आदिती कुलकर्णी, नम्रता हळदे, साहिल रांगळे यांचा प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक तसेच स्नेहल केंबळे हिला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. एलआयसी इन्शुरन्स पोस्ट बाबत मनाली नाचरे आणि साहिल आग्रे यांना विभागून प्रथम क्रमांक देण्यात आला तसेच दीक्षा पवार आणि अमृता आंबेकर यांचा द्वितीय आणि तृतीय क्रमांक आला आणि अस्मिता पडवळ ऋतुजा भेकरे आणि ऋतुजा साळवी यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आले. Mock Interview Competition
या बक्षीस वितरण कार्यक्रमाला लायन्स क्लब गुहागरचे उपाध्यक्ष श्री. सचिन मुसळे तसेच खजिनदार माधव शेठ ओक आणि या स्पर्धेचे सर्व परीक्षक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंदीता आग्रे आणि सूत्रसंचालन व समारोप कुमारी दीक्षा पवार हिने केला. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉक्टर एस एस खोत तसेच सौ.कांचन कदम आणि सुभाष घडशी यांनी विशेष प्रयत्न केले. Mock Interview Competition