बेस्टचा निर्णय; वर्षभरात होणार 1560 बस थांब्यांचे नुतनीकरण
मुंबई, ता. 29 : येत्या वर्षभरात शहरातील 1 हजार 560 बस थांब्यांचे नूतनीकरण आणि पुनर्बांधणी बेस्ट तर्फे करण्यात येणार आहे. त्यापैकी 10 बस थांब्यांवर लवकरच मोबाइल चार्जिंग, वायफाय, दिव्यांगांसाठी ब्रेललिपी चिन्हे आदी विविध सुविधा प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी माध्यमांना दिली. Mobile charging, WiFi facility at bus stops

मुंबईत बेस्टचे तीन हजारांहून अधिक बस थांबे आहेत. हे बस थांबे हरित, सौरऊर्जेची निर्मिती करणारे आणि प्रवासी सुविधांनी सुसज्ज बनविण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. काही बस थांबे हरित, तर काही थांब्यावर सौरऊर्जा निर्मिती करण्यास सुरुवात झाली आहे. आता 1 हजार 560 बस थांब्यांचे नूतनीकरण आणि पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. सर्व बस थांबे हे पर्यावरणपूरक असतील. सुमारे 100 दिवसांमध्ये 260 बस थांब्यांचे, तर 300 दिवसांमध्ये ऊर्वरित बस थांब्यांचे नूतनीकरण करण्यात येईल. 1560 बस थांब्यांपैकी जाहीरातींसाठी देण्यात आलेल्या बस थांब्यांचे नुतनीकरण आणि पुनर्बांधणी संबंधित जाहीरातदार कंपन्या करतील. 1560 पैकी 10 बस थांब्यांवर प्रायोगिक तत्त्वावर मोबाइल चार्जिंग, वायफाय, उत्तम आसन व्यवस्था, काचेचे छत, दिव्यांग प्रवाशांसाठी सांकेतिक ब्रेललिपी, सीसी टीव्ही कॅमेरा, प्रथमोचार पेटी अशा प्रवाशी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. यामध्ये मरिन ड्राईव्ह आणि हाजीअली परिसरातील 2 आणि उपनगरातील 8 थांब्यांचा समावेश आहे. अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी माध्यमांना दिली. Mobile charging, WiFi facility at bus stops

