गुहागर, ता. 11 : ठाण्यात लोकल रेल्वेमध्ये मोबाइलचा स्फोट झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. कळवा स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण उपनगरीय रेल्वेच्या महिला डब्यात हा स्फोट झाल्याचे समोर आले आहे. एका महिला प्रवाशाच्या मोबाइलचा स्फोट झाल्याने खळबळ उडाली होती, अशी माहिती पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. हा स्फोट रेल्वेत सोमवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास झाला आहे. Mobile blast in train


ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी यांनी पीटीआयला सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) – कल्याण उपनगरी ट्रेनमध्ये सोमवारी रात्री ८.१२ वाजता कळवा स्थानकात घडलेल्या या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. Mobile blast in train