• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 August 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मनसेचे नूतन पदाधिकारी व नवनिर्वाचित ग्रा. सदस्यांचा सत्कार

by Ganesh Dhanawade
January 30, 2023
in Politics
87 1
0
MNS's new office bearers felicitated
171
SHARES
489
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 30 :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) गुहागर तालुक्यातील नूतन पदाधिकांरी तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांची नियुक्ती करण्यात आली. याबाबत शृंगारतळी येथील गुहागर तालुका मनसे संपर्क कार्यालय येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. MNS’s new office bearers felicitated

गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर, संहसंपर्क अध्यक्ष समिर जोयशी यांच्या नेतृत्वाखाली रानवी शाखा अध्यक्ष सुहास चोगले, पिंपर शाखा अध्यक्ष राकेश रामचंद्र मोरे, वेलदुर शाखा अध्यक्ष सिद्धांत पाटील, कौंढर गट अध्यक्ष सचिन जोयशी यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी गुहागर तालुक्यातील मनसेचे ग्रामपंचायत सदस्या निवडून आलेल्या वैभवी विनोद जानवळकर ( ग्रा. जानवळे), रजनी रविंद्र कदम, वर्षा विलास शितप, सचिन नारायण जोयशी, विनेश सीताराम तांबे (ग्रा. कौंढर काळसुर) या सर्व सदस्यांचा अभिनंदन पत्र देऊन सन्मान करण्यात आला. MNS’s new office bearers felicitated

यावेळी मनसे तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर यांनी सर्व निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचे कौतुक करून सदस्य पदाचा उपयोग जास्तीत जास्त आपल्या प्रभागातील जनतेसाठी करण्याचे आवाहन केले. तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, गुहागर तालुक्यात मनसेच्या पक्षाची ताकद व संघटन वाढत आहे. युवा वर्ग मनसेकडे आकर्षित होत आहे. नागरिकांच्या न्याय- हक्कासाठी मनसे सतत लढा देत आहे. मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार’ “गाव तेथे मनसे शाखा ‘अभियान सुरू झाले आहे. घराघरात मनसे पोहोचविण्याचे काम सर्व कार्यकत्यांनी करायचे आहे. निवडुन आलेल्या प्रभाग सदस्यांनी प्रभागामध्ये नागरिकांसाठी काम करायचे आहे. प्रभागातील समस्या जाणून घेतल्या पाहीजेत. निवडून आलेल्या प्रत्येक सदस्यांनी मासिक व ग्रामसभेला उपस्थित राहुन नागरिकांचे प्रश्न मांडले पाहिजेत तरचं तो सदस्य पुढील काळासाठी सरपंचपदापर्यंत पोहोचू शकतो. तसेच नवीन नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी मनसे पक्ष वाढविण्यासाठी काम केले पाहिजे, असे आवाहन केले. MNS’s new office bearers felicitated

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

यावेळी विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष सागर शिरगावकर, उपतालुका अध्यक्ष सचिन जोयशी, शाखा अध्यक्ष सुनिल मुकनाक, ज्येष्ठ महाराष्ट्र सैनिक विक्रम जोयशी, राहुल जाधव, विवेक जानवळकर तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. MNS’s new office bearers felicitated

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMNS's new office bearers felicitatedNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share68SendTweet43
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.