गुहागर, ता. 07 : हिंदू जननायक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माझ्यावर गुहागर तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे. येत्या काळात गुहागर तालुक्यात मनसे अधिक बळकट करणार असून संघटना वाढीसाठी नाका तिथे शाखा स्थापन करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित मनसे तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांनी केले. MNS will strengthen in Guhagar – Haldankar
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका नुकत्याच करण्यात आल्या. मुंबई येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमांमध्ये बोरगाव ता. चिपळूण येथील सरपंच व ज्येष्ठ मनसे सैनिक सुनील हळदणकर यांची गुहागर तालुकाध्यक्ष पदासाठी नियुक्ती करून त्यांना राज ठाकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले होते. MNS will strengthen in Guhagar – Haldankar
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर म्हणाले, लहानपणापासून राज साहेबांचा मी समर्थक आहे. शिवसेनेमध्ये राज साहेब विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष असल्यापासून मी त्यांचा सक्रिय कार्यकर्ता आहे. राज साहेबांनी शिवसेना पक्ष सोडून मनसे पक्ष निर्माण केल्यानंतर मीही मनसे पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून मनसे सैनिक म्हणून मी यशस्वीपणे व निस्वार्थीपणे पक्षाचे काम करत आहे. सुरुवातीच्या काळात चिवेली पंचायत समिती गणात उपविभाग प्रमुख, रामपूर जिल्हा परिषद गटात विभागप्रमुख व रामपूर व कलंबट या दोन्ही जिल्हा परिषद गटात उपतालुका अध्यक्ष म्हणून मी काम केले आहे. मी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून राज साहेबांनी माझ्यावर गुहागर तालुक्याची जबाबदारी दिली आहे. MNS will strengthen in Guhagar – Haldankar
पुढील काळात राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, जिल्हा संपर्क अध्यक्ष सतीश नारकर, जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, जिल्हा सचिव संतोष नलावडे, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनानुसार तालुक्यात मनसे संघटना वाढीसाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. MNS will strengthen in Guhagar – Haldankar