• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

RGPPL कंपनीमध्ये स्थानिक बेरोजगारांना नोकऱ्या द्या

by Ganesh Dhanawade
October 7, 2022
in Guhagar
18 0
3
MNS statement to Tehsildars

तहसीलदार प्रतिभा वराळे यांना निवेदन देताना मनसेचे जिल्हाप्रमुख जितेंद्र चव्हाण, तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर, अंजनवेल विभाग अध्यक्ष संदिप खडपे व अन्य

36
SHARES
102
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मनसेचे गुहागर तहसीलदारांना निवेदन

गुहागर, ता.07 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँन्ड पॉवर प्रा. ली. (Ratnagiri Gas and Power Pvt. ) कंपनीमध्ये स्थानिक बेरोजगारांना नाकारले जात असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुहागर तहसीलदार प्रतिभा वराळे यांना निवेदन देण्यात आले. MNS statement to Tehsildars

या निवेदनात म्हटले आहे की, गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे गेल्या अनेक वर्षापासून रत्नागिरी गॅस अन्ड पॉवर प्रा. ली. कंपनी कार्यरत आहे. परंतु, रोजगाराच्या अनुशंगाने या कंपनीचा कोणताच फायदा येथील स्थानिक बेरोजगार तरुणांना होत नाही. मोठ्या प्रमाणात आपल्या कंपनी अंतर्गत कार्यरत असणाऱ्या एल अँन्ड टी व कोकण एल. एन. जी. या ठेकेदारी कंपन्यांच्या माध्यमातून मात्र परप्रांतीयांना मोठ्या प्रमाणात रोजगार दिला जात आहे. त्यामुळे तालुक्यात दिवसेंदिवस परप्रांतीयांचे लोंड येण्याचे प्रमाण वाढले असून भविष्यात गुन्हेगारीचेही प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. MNS statement to Tehsildars

खऱ्या अर्थाने सदरचा प्रकल्प कार्यान्वित होताना भूमिपुत्रांच्या जमिनी रोजगाराच्या भूलथापा देऊन शासनाने बळकावल्या. परंतु, स्थानिकांना अपेक्षित रोजगार देणेचे अनुषंगाने शासन व प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षामुळे आजही येथील स्थानिक बेरोजगार तरुण रोजगारापासून वंचित आहेत. स्थानिक प्रकल्पांमध्ये ८०% स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार दिलाच पाहिजे असा शासन निर्णय असताना मात्र प्रशासनाला या बाबीचा विसर पडला आहे. सर्व प्रथम रत्नागिरी गॅस अँन्ड पॉवर प्रा. ली. कंपनीमध्ये स्थानिक भूमिपुत्र बेरोजगार तरुणांना शासन निर्णयाप्रमाणे रोजगार मिळणेसाठी आपले स्तरावरून योग्य तो सकारात्मक कार्यवाही व्हावी. MNS statement to Tehsildars

सदर मागणीबाबत येत्या १५ ते २० दिवसांमध्ये सकारात्मक निर्णय न झाल्यास दि. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वा. मध्य रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष जितेंद्र चव्हाण व तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रा.ली. कंपनीवर भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी रोजगार हक्क मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिणामास संबंधित कंपनी व प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे. MNS statement to Tehsildars

तहसिल कार्यालयात निवेदन देण्यासाठी मनसे जिल्हा रत्नागिरी ( मध्य) जिल्हाप्रमुख जितेंद्र चव्हाण, तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर, अंजनवेल विभाग अध्यक्ष संदिप खडपे, अंजनवेल उपविभाग स्वप्नील कांबळे, महेश घाणेकर व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. MNS statement to Tehsildars

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMNS statement to TehsildarsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.