• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मनसे तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

by Ganesh Dhanawade
March 7, 2023
in Guhagar
95 1
0
MNS organized various programs

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

187
SHARES
533
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जागतिक महिला दिन, मनसे वर्धापन दिन व तिथीनुसार शिवजयंती

गुहागर, ता. 07 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या सौजन्याने व तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व समस्त मनसैनिकांच्या सहकार्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मनसे पक्षाचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, जिल्हा संपर्क अध्यक्ष सतीश नारकर, रत्नागिरी जिल्हा (मध्य) अध्यक्ष जितेंद्र चव्हाण, जिल्हा सचिव संतोष नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरे करण्यात येणार आहेत. यामध्ये जागतिक महिला दिन, मनसे वर्धापन दिन आणि तिथीनुसार शिवजयंती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. MNS organized various programs

यानिमित्त बुधवार दि. ८ मार्च रोजी कर्दे मनसे शाखा येथे महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, गुरुवार दि. ९ मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धापन दिनानिमित्त गुहागर तालुका मध्यवर्ती संपर्क कार्यालय शृंगारतळी येथे सकाळी ९ वा. श्री सत्यनारायण महापूजा, आरती, प्रसाद, सायं. ६.३० वा. सांब सदाशिव सभागृह, (पाटपन्हाळे हायस्कूल पटांगण) येथे प्रत्येक समाजाचा उत्कर्ष हे मनसेचे उद्दिष्ट याच उद्दिष्ट पूर्तीचा भाग म्हणून गुहागर तालुक्यातील सर्व समाजातील तालुकाध्यक्षांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. MNS organized various programs

यावेळी महेश नाटेकर (खारवी समाज), सुभाष भाई रजपूत (गोसावी समाज), मुकुंद पानवलकर (लोहार समाज), वसंत देऊडकर (सुतार समाज), विठ्ठल भालेकर (भोई समाज), प्रकाश कारेकर (सोनार समाज), अरविंद पालकर (कुंभार समाज), संजय पवार (नाभिक समाज), महेंद्र महाडिक (गवळी समाज), विजय जानवळकर (चर्मकार समाज), विनोद पवार (बेलदार समाज), रवींद्र चंद्रकांत कोतवडेकर (गुरव समाज ), रमेश राजाराम नेटके (कोष्टी समाज ), रामचंद्र हुमणे ( कुणबी समाज), भरत शेटे (भंडारी समाज), आनंद खरे (ब्राह्मण समाज), गजानन वेल्हाळ (शिंपी समाज), प्रकाश शिर्के (मराठा समाज), सुनील जाधव (बौद्ध समाज), प्रकाश झगडे (तेली समाज), आनंद पवार (नंदीवाले समाज), साबीर साल्हे (मुस्लिम समाज), प्रशांत शिरगावकर (वैश्य समाज), सुरेश मर्दा (महेश्वरी समाज), प्रवीण पटेल (पाटीदार समाज) आदींचा सन्मान करण्यात येणार आहे. MNS organized various programs

तसेच महिला दिनानिमित्त तालुक्यातील उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला आहे. यामध्ये डॉ. योगिता खाडे (आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू ), श्रीम. माधवी अरुण जाधव (संरक्षण अधिकारी महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन), श्रीम. रसिका राजन दळी (उद्योजक महिला मातीची भांडे जिल्हास्तरीय पुरस्कार), श्रीमती पुनम राजेंद्र साळवी (वकील, संघटना खजिनदार), डॉ. रूपाली जानवळकर (दंतचिकित्सक), श्रीम. वैशाली प्रतीक रहाटे (पोलीस महिला), श्रीम. संगीता संदीप भाटकर ( एचपी गॅस एजन्सी), श्रीम. अमृता अंकुश जानवळकर (आशा सेविका), श्रीम. मयुरी महेश शिगवण (सरपंच तळवली), श्रीम. समीक्षा स्वप्नील बारगोडे (सरपंच वेळब ), श्रीम. विजया मैस्त्री (अंध महिला उद्योजक गॅस एजन्सी आणि दुकान) यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री ९ वा. पारंपारिक कलागुणांचा कार्यक्रम ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज हा कार्यक्रम होणार आहे. MNS organized various programs

शुक्रवार दि. १० मार्च रोजी सायं. ४ वा. तीथीनुसार शिवजयंती निमित्त शृंगारतळी मच्छीमार्केट ते मध्यवर्ती संपर्क कार्यालय मनसे गुहागर (शृंगारतळी) पर्यंत भव्य मिरवणुक काढण्यात येणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, तालुका विनोद जानवळकर यांनी केले आहे. MNS organized various programs

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMNS organized various programsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share75SendTweet47
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.