गुहागर, ता.17 : गुहागर मध्ये महावितरण विभागातल्या कंत्राटी कर्मचाऱ्याला तडकाफडकी काढून टाकल्याबद्दल गुहागर मनसे शुक्रवारी आक्रमक झाली. नोकरीवरून काढून टाकल्याचा जाब विचारण्यासाठी गुहागर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच घेरले. MNS is aggressive about Mahavitaran employees


यावेळी आठ दिवसाच्या आत सदर कर्मचाऱ्याला कामावर रुजू करून न घेतल्यास गुहागर मनसेने रस्त्यावर उतरण्याचा इशारादेखील महावितरण अधिकाऱ्यांना दिला. दहा वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला अचानक काढल्यामुळे कॉन्ट्रॅक्टर च्या विरोधात मनसे शुक्रवारी चांगलीच आक्रमक झाली. मनसेचे संपर्क प्रमुख प्रमोद गांधी आणि तालुका प्रमुख विनोद जानवळकर यांनी महावितरण अधिकाऱ्यांना यावरून चांगलेच धारेवर धरले. यावेळी गुहागर मधील महावितरणच्या कंत्राटी कर्मचारी देखील आक्रमक झाले व त्यांनी काम बंद करण्याचा इशारा महावितरण अधिकाऱ्यांना दिला. पगार झाल्यानंतर काँट्रॅक्टर दर महिन्याला कमिशन स्वरूपात जबरदस्तीने कर्मचाऱ्यांकडून पैसे वसूल करत असतात. तसेच पैसे द्यायचे बंद केल्यामुळेच संदीप कीर्वेला कामावरून काढून टाकल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी यावेळी करण्यात आला. MNS is aggressive about Mahavitaran employees


यावेळी मनसे गुहागर संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, गुहागर तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर, नवनाथ साखरकर, प्रसाद कुष्टे, महेश घाणेकर तसेच मनसे सैनिक उपस्थित होते. MNS is aggressive about Mahavitaran employees