ब्लू पॅंथर विरुद्ध विराट विश्वकर्मा उदघाटन सामन्यात ब्लू पॅंथर विजयी
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 11 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (गुहागर विधानसभा क्षेत्र) गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वतीने “एक समाज एक संघ”, “समाज एकता मनसे चषक २०२५” गुहागर विधानसभा क्षेत्र मर्यादित क्रिकेट स्पर्धेला गोल्डन पार्क, शृंगारतळी जानवळे फाटा येथील मैदानावर शानदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील प्रत्येक खेळाडूंना मनसेच्या वतीने भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. MNS Cup Cricket Tournament


या स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर ,डॉ.राजेंद्र पवार व सर्व समाज अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रतिमांना पुष्पहार घालून करण्यात आले. यावेळी उदघाटन सामना बौद्ध समाजाच्या ब्लू पॅंथर विरुद्ध सुतार समाजाच्या विराट विश्वकर्मा विरुद्ध झाला या सामन्यात बौद्ध समाजाच्या ब्लू पॅंथर संघाने विजयी झाला. MNS Cup Cricket Tournament
या उदघाटन समारंभासाठी पाटपन्हाळे ग्रामपंचायत उपसरपंच असीम साल्हे, नामवंत डॉ. राजेंद्र पवार, मामा शिर्के,हॉटेल हेमंतचे मालक ओंकार संसारे,सामाजिक कार्यकर्ते गौरव वेल्हाळ, पिंट्या संसारे, महेंद्र मोहिते, संतोष धामणस्कर, मारुती मोहिते,सुरेश जाधव, भीमसेन सावंत, मुकेश असगोलकर,सुमित नांदलस्कर, कैलास पिळणकर, सुदेश सकपाळ, सह संपर्क अध्यक्ष समीर जोयशी, सुरेंद्र निकम, अंतिम संसारे, उप तालुकाध्यक्ष जितेंद्र साळवी, अमित खांडेकर उपस्थित होते. MNS Cup Cricket Tournament


या स्पर्धेमध्ये खारवी समाज (सागरी योद्धा), भंडारी समाज (टायगर योद्धा), सुतार समाज (विराट विश्वकर्मा), भाविक गुरव समाज (जीपीएल यंग स्टार), मुस्लिम समाज (आझाद रॉयल फायटर्स), वैश्य वाणी समाज (कोकण कट्टा), नंदीवाले समाज (श्री तिरुपती बालाजी), तेली समाज (जय संताजी), बौद्ध समाज (ब्लू पँथर्स), बेलदार समाज (ओम साई इलेव्हन), कुणबी समाज (भूमिपुत्र फायटर्स), मराठा समाज( स्वराज्य रक्षक) असे एकूण १२ संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमध्ये एकूण बारा समाजातील अष्टपैलू खेळाडूंचा सहभाग आहे. MNS Cup Cricket Tournament
यावेळी मनसेचे गुहागर विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख श्री.प्रमोद गांधी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, गुहागर तालुक्यातील खेळाडूंनी राज्य, देशाचे नेतृत्व करावे यासाठी माझ्याकडून जे सहकार्य लागेल ते मी देण्यास तयार आहे. स्पर्धा ही जिंकण्यासाठी खेळायची असते, या स्पर्धेतून चांगले खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी या स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे सूत्रसंचालन शाहिर शाहिद खेरटकर यांनी केले. तर समालोचन म्हणून सिद्धेश ऊतेकर, सिद्दिक मेमन, असीम साल्हे यांनी केले. MNS Cup Cricket Tournament