• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महाविकास आघाडीचा रडीचा डाव

by Mayuresh Patnakar
December 7, 2024
in Politics
111 1
2
Oath ceremony in Nagpur
217
SHARES
621
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अजितदादा; विरोधी पक्षाच्या आमदारांना शपथ घ्यावीच लागेल

मुंबई, ता. 07 : महायुतीला इतके मोठे बहुमत मिळाले आहे की, आता ईव्हीएमचा विषय काढून महाविकास आघाडी रडीचा डाव खेळत आहे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर माध्यमांशी बोलताना केला. MLAs will have to take an oath

आम्ही महाविकास आघाडीमध्ये काम केले आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीनला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. लोकसभेला ईव्हीएमने ३१ जागा महाविकास आघाडीला दिल्या त्यावेळी ईव्हीएम मशीन खूप चांगली होती. मात्र विधानसभेत महायुतीच्या बाजुने जनतेने कौल दिला तर ईव्हीएमला दोष द्यायला मविआने सुरुवात केली आहे. लोकशाहीत प्रत्येकाला वक्तव्य करण्याचा अधिकार आहे. परंतु महाविकास आघाडीच्या आमदारांना शपथ घेण्याचा उद्याचा दिवस आहे. त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल. तरच त्यांना सोमवारी कामकाजात भाग घेता येणार आहे. याबाबतची माहिती सर्वांना आहे. परंतु पहिल्याच दिवशी आम्ही संख्येने कमी असलो तरी आम्ही काही वेगळ करतोय. त्यांचे अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रकार सुरू आहे असा खोचक टोलाही अजित पवार यांनी केला. MLAs will have to take an oath

सुरुवातीला महाविकास आघाडीचे आमदार शपथविधीसाठी सभागृहात बसले होते मात्र काही वेळाने ते सर्व बाहेर निघून गेले. इतकी वर्षे मी त्यांच्यासोबत होतो तेव्हा मी चांगला होतो. मी कुणासोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम केले नाही ते सांगा अशी विचारणा करत मी जर दोषी असतो किंवा भ्रष्टाचारी असतो तर त्यांनी मला उपमुख्यमंत्री केलेच नसते. मात्र सध्या ते राजकीय भूमिकेतून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. परंतु मी योग्यठिकाणी न्याय मागत होतो आणि तो मला मिळाला आहे असेही अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नांला उत्तर देताना स्पष्ट केले. MLAs will have to take an oath

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsMLAs will have to take an oathNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share87SendTweet54
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.