सेंद्रिय खतांमुळेच जमिनीची सुपिकता टिकून राहते; आ.भास्करराव जाधव
गुहागर, ता. 26 : लेंडीखत, कोंबडीची शिट, गांडूळ खत, यासारख्या खतांच्या वापरामुळे जमिनीतील गांडूळांची संख्या वाढून जमिनीची सुपिकता टिकून राहते. जमिनीतील हे सेंद्रिय घटक एकमेकांना व पिकांच्या वाढीसाठी पुरक असतात. त्यामुळे याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्याचे आवाहन आ. भास्करराव जाधव यांनी शेतकऱ्यांना केले. MLAs visited the watermelon plantation in Zombadi

पंचायत समिती सेस फंडातून गुहागर तालुक्यात राबविण्यात आलेल्या कलिंगड लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत झोंबडी येथे लागवड केलेल्या समीर रहाटे यांच्या कलिंगड प्रक्षेत्राला आ.भास्करराव जाधव यांनी आवर्जून भेट दिली. यावेळी ते बोलत होते. समीर रहाटे यांनी मुंबईतून गावात येऊन शेती केल्याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांचे आ.जाधव यांनी कौतुक केले. तुमच्याकडे कमी क्षेत्र आहे. झोंबडी परिसरातील उघडा माळ हा असाच लागवडीखाली यावा,अशी अपेक्षाही चर्चेदरम्यान त्यांनी व्यक्त केली. MLAs visited the watermelon plantation in Zombadi
समीर रहाटे हे पूर्वी मुंबईत वास्तव्यास होते. वडिल दत्ताराम रहाटे यांच्या सेवानिवृत्तीनंतर ते ५ वर्षापुर्वी कुटुंबासह गावाकडे आले. विविध कंपन्यांसह रिलायन्स फिल्म अॅड मास मिडियामध्ये काम केलेल्या समीर यांनी पत्नी पल्लवीसह गावी आल्यानंतर आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मर्यादित जागेतच आंतरपीक म्हणून कलिंगड व भाजीपाला लागवड करण्याचा प्रयत्न दोन- तीन वर्षांपासून समीर रहाटे करीत आहेत. या वर्षी पंचायत समितीच्या कलिंगड लागवडीच्या उपक्रमाची त्यांना जोड मिळाली. MLAs visited the watermelon plantation in Zombadi
रहाटे यांनी अत्यंत आधुनिक पद्धतीने कलिंगड लागवड केली आहे. २५ गुंठे क्षेत्रावर दोन टप्प्यांत उत्पादीत होतील अशा पद्धतीने लागवडीचे नियोजन केले आहे. प्रो-ट्रे मध्ये ‘अगस्टा’ व ‘गोल्डन’ या वाणाची रोपे तयार केली. २१ ते २५ दिवसांनी त्यांची लागवड केली. लागवडीसाठी मल्चिंग पेपरचा वापर करून ठिंबक सिंचन व्यवस्था बसवली. आता पहिल्या टप्प्यातील लागवड केलेल्याची कलिंगड तोडणीला आली आहे.अधिकाधिक सेंद्रिय खात्याचा व आवश्यक तेव्हा विद्राव्य खतांचा योग्य पद्धतीने वापर करून उत्तम चवीचे कलिंगड उत्पादीत केले आहे. योग्य वेळी किड -रोगापासून संरक्षण करण्यासाठी पंचायत समितीच्या कृषी अधिकारी आर. के. धायगुडे, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या फवारण्या करण्यात आल्या आहेत. MLAs visited the watermelon plantation in Zombadi
यावेळी आमदार जाधव यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने शाल-श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या सोबत माजी जि.प.सदस्य सौ.नेत्रा ठाकूर, झोंबडीचे सरपंच अतुल लांजेकर, गट विकास अधिकारी प्रशांत राऊत , सहाय्यक गट विकास अधिकारी प्रमोद केळस्कर, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर व इतर मान्यवर तसेच सरपंच अतुल लांजेकर, उपसरपंच संदीप गोणबरे, ग्रामपंचायत सदस्य प्रणाली पवार,जैनाब ममतुले, अफजल ममतुले, रूकसार ममतुले, मयुरी लांजेकर, ग्रामसेवक सुलभाताई बडद, कर्मचारी गणेश लांजेकर, दिलीप गोणबरे यांच्यासह वाडीप्रमुख व ग्रामस्थ उपस्थित होते. MLAs visited the watermelon plantation in Zombadi

