गुहागर, ता. 31 : लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर संचलित आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, चिपळूण. या संस्थेच्या कौशल्य विकास आधारीत प्रशिक्षण उपक्रमाला शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्री.बाळाराम पाटील यांनी कौतुक केले. MLA Patil praised the Arekar Foundation
ही संस्था कोकणातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत व सवलतीच्या दरात कौशल्य विकास आधारित कोर्सेस आणि प्रशिक्षण देत आहेत. विविध नामांकित कंपन्यांशी करार केला आहे. तसेच इन्स्टिट्यूट ला संलग्न असणाऱ्या विविध नामांकित कंपनी आणि हॉटेल क्षेत्रात नोकरी उपलब्ध करून देत आहे. या उपक्रमाचे आ. श्री. बाळाराम पाटील यांनी कौतुक केले. तसेच ते संस्थेला मार्गदर्शन आणि सहकार्य देखिल करत असतात. MLA Patil praised the Arekar Foundation

आ. बाळाराम पाटील हे स्वतः शिक्षण संस्था चालवतात. अनेक संस्थावर ते संचालक देखील आहेत. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला ते कायम मार्गदर्शन करत असतात. तसेच श्री. साहिल आरेकर हे देखील लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात उत्तम काम करत आहेत. MLA Patil praised the Arekar Foundation

