एस टी. कंत्राटी कामगारांना सेवेत रुजू करुन घेणेसंदर्भात
गुहागर, ता.14 : राज्य परिवहन महामंडळाने बाह्य संस्थेमार्फत नियुक्ती दिलेल्या कंत्राटी कामगारांना सेवेत रुजू करुन घेणेसंदर्भात आमदार शेखर निकम यांनी कर्मचाऱ्यांसोबतच विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार यांची भेट घेतली. MLA Nikam met Ajit Dada

राज्य परिवहन महामंडळाच्या चालक / वाहक व इतर कर्मचारी यांनी शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी बेमुदत संप सुरू केला. आणि तो दीर्घकाळ चालला. संपादरम्यान चालक/वाहक विना प्रवाशांचे खुप हाल झाले होते. संप काळात वाहतुक सुरळीत चालू ठेवण्यासाठी रा. प. महामंडळाने बाह्य संस्थेमार्फत कंत्राटी पध्दतीने कामगारांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र 1 महिना मुदत बाकी असताना कुठल्याही पुर्वसूचना न देता अचानक दि. 02.09.2022 च्या आदेशाने कंत्राटी कामगारांना कमी करण्यात आले आहे. MLA Nikam met Ajit Dada
संपादरम्यान अडचणीच्या काळात या कंत्राटी एस. टी. कामगारांनी चांगल्या रितीने काम केले. मात्र अचानक कामावरुन कमी केल्याने त्यांचेकडे आता कोणतेही काम नाही. अन्य उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे सद्यः त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यासंदर्भात कंत्राटी एस. टी. कामगारांनी याबाबत आमदार शेखर निकम यांना निवेदन दिले व आपल्या सर्व समस्या सांगितल्या व रा.प. महामंडळाने बाह्य संस्थेमार्फत नियुक्ती दिलेल्या कंत्राटी कामगारांनी सेवेत रुजू करुन घेणेसंदर्भात मागणी केली. MLA Nikam met Ajit Dada

आमदार शेखर निकम यांनी कंत्राटी कर्मचारी यांच्या सर्व समस्या जाणून घेऊन त्या तातडीने सोडवता याव्या. यासाठी विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार यांची राज्य परिवहन महामंडळाने बाह्य संस्थेमार्फत नियुक्ती दिलेल्या कंत्राटी कामगारांसोबत भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. या चर्चेदरम्यान मा. अजितदादा पवार यांनी मा. परिवहन आयुक्त शेखरजी चन्ने साहेब यांच्याशी चर्चा केली. लवकरच या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहेत व या मधुन मार्ग निघावा व हा प्रश्न निकाली निघावा अशी मागणी करणार आहेत. MLA Nikam met Ajit Dada
यावेळी रा. प. कंत्राटी कर्मचारी मंगेश कांबळी, राजेश मोहिते, विकास जाधव, योगेश निमकर उपस्थित होते. MLA Nikam met Ajit Dada
