लवकरच रुग्णालय सुरू करण्याचे संकेत
गुहागर, ता. 15 : तालुक्यातील रानवी येथील बंद अवस्थेतील निरामय रुग्णालयाची विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी मंगळवारी पाहणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार ही पाहणी करण्यात आल्याचे सांगत, रुग्णालयाच्या दुरुस्तीनंतर लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी दिली. MLA Jathar inspects Niramay Hospital
यावेळी बोलताना आमदार जठार म्हणाले, रानवी परिसरासह संपूर्ण गुहागर तालुक्यासाठी निरामय रुग्णालयाची मोठी गरज आहे. हे रुग्णालय पुन्हा सुरू व्हावे, अशी जनतेची तसेच भाजप पदाधिकारी आणि माजी आमदार डॉ. विनय नातू यांची इच्छा आहे. रुग्णालयाची पाहणी करून झालेल्या नुकसानीचा आणि दुरुस्तीसाठी लागणाऱ्या खर्चाचा अहवाल शासनाकडे सादर केला जाणार असून, त्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल. MLA Jathar inspects Niramay Hospital
या पाहणीवेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा उपाध्यक्ष अजित साळवी, जिल्हा सरचिटणीस व उपसभापती निलेश सुर्वे, जिल्हा सरचिटणीस तथा जालगावचे सरपंच अक्षय फाटक, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संकल्प अवेरे, माजी सरपंच यशवंत बाईत, तालुका सरचिटणीस सचिन ओक, तालुका कोषाध्यक्ष साईनाथ कळझुणकर, दाभोळ पॉवर कंपनीचे संचालक कुबेर डेक्कनवार, महाराष्ट्र पॉवर कॉर्पोरेशनचे सल्लागार हेमंत महाजन, अभियंता निखिल तलाठी, यश मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल, दापोलीचे सागर भदे, आदित्य वराड आदी उपस्थित होते. MLA Jathar inspects Niramay Hospital
