आ. भास्करशेठ जाधव यांचा अधिकाऱ्यांना इशारा
चिपळूण, ता. 22 : रत्नागिरी जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत सर्वाधिक पाणी योजनांची कामे गुहागर मतदार संघात होत आहेत. मतदार संघातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी पीएमसी समितीकडे जास्त प्रस्ताव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव व आपण आमदार असल्याने सादर केले व त्याला मंजूरी मिळवली. कोट्यावधीच्या योजना सुरु झाल्या. परंतु या योजना दर्जेदार व्हाव्यात यासाठी कोणती एजन्सी काम करणार ? अधिकारी व ठेकेदार संगनमत करून या योजना राबविणार असतील व लोकांना पाणीच मिळणार नसेल तर या योजनेतील कामांची चौकशी करून विधानसभेच्या अधिवेशनात आपण पर्दापाश करू, असा इशारा आमदार भास्करशेठ जाधव यांनी पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना दिला. MLA Jadhav’s warning to the authorities
जलजीवन मिशन योजनेंतर्गत मंजूर कामांचा आढावा आ. भास्करशेठ जाधव यांनी गुरुवारी आपल्या संपर्क कार्यालयात घेतला. यावेळी चिपळूणचे उपअभियंता अविनाश जाधव, खेडचे श्री. पवार, गुहागरचे श्री. छत्रे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. गुहागर मतदार संघात येणाऱ्या ज्या ज्या गावात जलजीवन योजना मंजूर आहेत. त्याबाबत सविस्तर माहिती आ. जाधव यांनी घेतली. या योजना कोणी मंजूर केल्या? आपल्या मतदार संघातच जास्त योजना का मंजूर झाल्या व कशा झाल्या याचा उहापोह करताना आपण व विक्रांत जाधव यांनी त्यासाठी कोणते प्रयत्न केले ते पटवून दिले. आता एकाही योजनेबाबत आपणास कोणी बोलत नाही याचा अर्थ अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमतान सर्व होत आहे, असे वाटत असेल तर आपण गप्प बसणार नाही. MLA Jadhav’s warning to the authorities

गुहागर मतदार संघातील चिपळूण तालुक्यातील ७० योजनांपैकी ४७ योजनांची वर्कऑर्डर झाली आहे. तर २३ योजना निविदा स्तरावर आहेत. खेडमध्ये ११९ योजनांपैकी ३६ योजनांची वर्क ऑर्डर झाली. ७३ योजना निविदास्तरावर आहेत. १० योजना शासनस्तरावर आहेत. गुहागरमधील ५६ योजना निविदास्तरावर असल्याचे सांगण्यात आले. ठराविक ठेकेदारांकडेच कामे कशी गेली. काही ठेकेदार व पोट ठेकेदार यांचीही पोलखोल आ. जाधव यांनी करून अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सुनावले. काही योजना अद्याप पूर्ण नसताना एकाच गावात तीन तीन योजनांचे पैसे खर्च कसे होतात याचीही गावाच्या नावासह उदाहरणे दिली. कोणाही ठेकेदाराला पाठीशी घालू नका. तुमचे काय असेल ते तुम्ही पाहा परंतु ठेकेदाराने दर्जेदार काम केले नाहीतर आपण चौकशी लावू असेही आ. जाधव यांनी स्पष्ट केले. MLA Jadhav’s warning to the authorities
ठराविक ठेकेदारांनाच मिळणाऱ्या योजनेच्या कामांवर त्यांनी आक्षेप घेतला असता अनेक योजनांच्या निविदा दोन तीन वेळा काढूनही ठेकेदारांचा प्रतिसाद मिळत नाही. ठेकेदारांनी संगनमत (रिंग) करून निविदा भरण्यावरच बहिष्कार टाकला. व नंतर ७ ते १० टक्के वाढीव निविदा काढून ती कामे वाटून घेतल्याचे समोर आले. त्यामुळे ठेकेदार कोणाचे ऐकत नाहीत, कोणाशी संपर्क साधत नाहीत हे योग्य नाही. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन चांगली कामे व्हायला हवीत. लोकांचा पाण्याचा प्रश्न कायम सुटला पाहिजे. यात कोणी हलगर्जीपणा केला तर आपण चौकशी करून विधानसभेच्या अधिवेशनात या योजनेचा पर्दाफाश करणार असल्याचेही यावेळी आ. जाधव यांनी सांगितले. MLA Jadhav’s warning to the authorities