• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आ. जाधव यांची साजिरी गांडूळ खत प्रकल्पाला भेट

by Ganesh Dhanawade
March 1, 2023
in Guhagar
107 2
1
MLA Jadhav's visit to Vermicompost Project
211
SHARES
603
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

बचत गटांच्या महिलांनी बॅंकांचा एकही पैसा थकवला नाही; आ. भास्कर जाधव

गुहागर, ता. 01 : गुहागरच्या महिला प्रचंड मेहनती आहेत. व्यवहाराला अत्यंत चोख आहेत म्हणून यांना जास्तीत जास्त उत्पन्नाची साधने निर्माण करून देण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. असे सांगून कोरोना सारख्या काळात लोकांनी लाखो रूपये थकवले पण या बचत गटातील महिलांनी त्याही काळात बॅंकांचा एकही पैसा थकवला नाही,असे कौतुकाचे उद्गार आमदार भास्करराव जाधव यांनी काढले. MLA Jadhav’s visit to Vermicompost Project

आमदार जाधव गुहागर दौऱ्यावर आले असताना कौंढरकाळसूर येथील साजिरी उत्पादक गटाच्या गांडूळ खत प्रकल्पाला त्यांनी आवर्जून भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत माजी जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर, गट विकास अधिकारी प्रशांत राऊत, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, उमेद अभियानाच्या व्यवस्थपक प्राजक्ता ओक, सरपंच सिया गुजर व इतर मान्यवर उपस्थित होते. MLA Jadhav’s visit to Vermicompost Project

आ. जाधव पुढे म्हणाले की, या महिला बचत गटांमध्ये प्रत्येक कुटुंबाची महिला जोडली गेली आहे. आपण कळत न कळत, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या प्रत्येक कुटुंबातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक मदत करतो. अशी ताकद या महिला बचत गटात आहे. म्हणून हे महिला बचत गट सक्षम केले पाहिजे. असेही त्यांनी सुचविले. त्याच बरोबर या महिला बचत गटांना त्यांचे उत्पादन तयार करण्यासाठी लागणा-या मशनरी शासनाच्या विविध योजनांमधून त्यांना उपलब्ध करून देता येईल का? काही खाजगी कंपन्यांकडून काही मदत घेऊन देवू शकतो का? त्याचबरोबर महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना, मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देऊ शकतो, या तीन पातळीवर आपण काम सुरू केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. MLA Jadhav’s visit to Vermicompost Project

बचत गटाच्या वतीने सी.आर.पी स्वाती महाडिक यांनी गांडूळ खत प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती आमदार महोदयांना दिली. तसेच प्रकल्पासाठी चाळणी यंत्र उपलब्ध करून देण्याची मागणी आ.जाधव यांच्याकडे केली. याबाबत त्वरित प्रस्ताव देण्याची सूचना त्यांनी बचत गटाला केली. MLA Jadhav’s visit to Vermicompost Project

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

यावेळी उपसरपंच सायली रामाणे, माजी प.स.सदस्य धनश्री मांजरेकर, ग्रामसेवक श्री. घेवडे, ग्रामरोजगार सेवक गणेश मांजरेकर, सेंद्रिय उत्पादक शेतकरी चंद्रकांत महाडिक, ग्राम सेवा संघाच्या अध्यक्षा विनया बडदे, विवेक भिडे, साजिरी उत्पादक गटाच्या अध्यक्षा ज्योती महाडिक, उपाध्यक्ष विद्या पवार, सचिव रुपाली खांडेकर, सीआरपी स्वाती महाडिक, रेश्मा रहाटे,अंकीता खांडेकर, जयश्री खांडेकर, सान्वी खांडेकर, रंजीता खांडेकर, सुभद्रा रहाटे, योगिता गीते, मधुरा गुरव, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. MLA Jadhav’s visit to Vermicompost Project

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMLA Jadhav's visit to Vermicompost ProjectNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share84SendTweet53
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.