गुहागर, ता. 13 : महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री, लोकप्रिय आमदार भास्करशेठ जाधव यांच्या पडवे मोहल्यामध्ये प्रचारादरम्यान मशाल चिन्हाचा प्रचार करताना आमदारांच्या पत्नी सौ. सुवर्णा जाधव या गुहागर विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांना सोबत घेऊन प्रचाराची यंत्रणा राबवत आहेत. गुहागरमधील प्रत्येक गटामध्ये त्या महिलांना सोबत घेऊन जाऊन घरोघरी प्रचार करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे. MLA Jadhav’s house to house campaign
प्रचारामध्ये तालुका सचिव विलास गुरव, उपविभाग प्रमुख खोडदेगण शरद साळवी, उप विभाग प्रमुख पडवेगण विजय वैद्य, महिला विभाग प्रमुख पडवे गट श्रीमती वनिता डिंगणकर, ज्येष्ठ शिवसैनिक चेअरमन राजेंद्र साळवी, ज्येष्ठ शिवसैनिक दशरथ साळवी, विजय मोहिते, सरपंच खोडदे पूजा गुरव, माजी सभापती सौ. श्वेता गडदे, माजी सभापती गुहागर सौ. पूर्वी निमुणकर, माजी सभापती गुहागर सौ. वृषाली वैद्य, माजी सरपंच खोडदे सौ. रश्मी साळवी, सौ. वैभवी जाधव, सौ. कांचन शिंदे, सौ. घाग मॅडम, स्नेहल बाईत अध्यक्ष जगदीश गडदे, बाळकृष्ण गोणबरे, प्रथमेश निमुणकर, संतोष गडदे, शुभम बाईत, विनोद गडदे, नजीर जांभरकर-अध्यक्ष पडवे मोहल्ला, इक्बाल दाऊद इबजी, हसनमिया तवसाळकर, यासीन टेमकर, सईद सारंग, महबूब इबजी, मुजफ्फर तवसाळकर, शहाबाद इब्जी, सहुद माजगावकर, अन्सार इब्जी, इसाक तांडेल, यासीन टेमकर, बजरुद्दीन तवसाळकर व पडवे मोहल्यातील मतदार बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. MLA Jadhav’s house to house campaign