आमदार जाधव आक्रमक, भाजपच्या पदाधिकाऱ्यावर संशय
गुहागर, ता. 04 : तालुक्यातील वेळणेश्र्वर जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ. नेत्रा ठाकूर यांच्या घरावर पाळत ठेवण्यात आली. याबाबत गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे. चौकशीमध्ये संबंधितांनी भाजप पदाधिकाऱ्यांचे नाव घेतले आहे. तरीदेखील पोलीस संतोष जैतापकर यांना चौकशीसाठी का बोलावत नाहीत. असा प्रश्र्न आमदार भास्कर जाधव यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राज माने यांना विचारला. MLA Jadhav is aggressive about the complaint of Zilla Parishad member
वेळणेश्र्वर येथे जिल्हा परिषद सदस्या सौ. नेत्रा ठाकूर यांचे निवासस्थान आणि पर्यटन संकुल आहे. जून अखेरीस तीन पर्यटक त्यांच्याकडे रहाण्यासाठी खोली मिळेल का म्हणून चौकशीसाठी आले होते. मात्र त्यांची वर्तणुक संशयास्पद वाटल्याने पर्यटन व्यवसाय सांभाळणाऱ्या सौ. नेत्रा ठाकुर यांच्या मुलीने त्यांना खोली नाकारली. तरीदेखील हे तीनजण त्याच्या पर्यटन संकुलाभोवती घुटमळत होते. या काळात सौ. नेत्रा ठाकुर घरी नव्हत्या. मुलीने आईवडिलांना दूरध्वनीवरुन हा सर्व प्रकार सांगितल्यावर याबाबतची तक्रार सौ. नेत्रा ठाकुर यांच्या मुलीने गुहागर पोलीस ठाण्यात दाखल केली. MLA Jadhav is aggressive about the complaint of Zilla Parishad member
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2023/07/add.jpg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2023/07/add.jpg)
गुहागर पोलीसांनी तातडीने या तीन पर्यटकांची चौकशी केली. हे पर्यटक बांधकाम क्षेत्राशी संबंधित आहेत. वेळणेश्र्वरला राहुन झाल्यावर जैतापकरांना भेटायला जाणार असल्याचे त्यांनी चौकशीदरम्यान पोलीसांना सांगितले. मात्र संपूर्ण चौकशीमध्ये पोलीसांना संशयास्पद असे काही बिंदू मिळाले नाहीत. दरम्यान संतोष जैतापकर हे राजकीय शत्रु असल्याने त्यांनीच आमच्या घराची रेकी करण्यासाठी, पहाणी करण्यासाठी या तिघांना पाठवले होते. त्यामुळे संतोष जैतापकर यांचीही चौकशी व्हावी. अशी मागणी सौ. नेत्रा ठाकूर यांनी पोलीसांकडे केली. मात्र पोलीसांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले. MLA Jadhav is aggressive about the complaint of Zilla Parishad member
हाच धागा पकडून निषेध मोर्चासाठी गुहागर मध्ये आलेल्या आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर पोलीस ठाणे गाठले. तेथे उपविभागीय पोलीस अधिकारी राज माने यांची भेट घेतली. संशयित व्यक्ती संतोष जैतापकर यांचे नाव घेत आहेत. मग पोलीस हे नाव का टाळत आहेत. तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का. असा प्रश्र्न विचारत आक्रमक झालेल्या आमदार जाधव यांनी आज सरकारच्या विरोधात मोर्चा काढला. भविष्यात पोलीसांच्या विरोधात मोर्चा काढावा लागेल. असा इशाराच गुहागर पोलीसांना दिला. MLA Jadhav is aggressive about the complaint of Zilla Parishad member
जाहीर मेळाव्यात या घटनेचा उल्लेख आमदार जाधव यांनी केला. भाजपकडून विरोधकांच्या घरावर पाळत ठेवण्यात येते. एका महिला सदस्याच्या घराची रेकी करण्यात येते असल्याचा आरोप त्यांनी केला.