आ.भास्करशेठ जाधव अभिष्टचिंतन विशेष !
आपल्या वक्तृत्व शैलीने, अभ्यासपूर्ण भाषणामुळे, विधिमंडळातील आक्रमक आणि अभ्यासपूर्ण विषयांवरील मुद्देसूद मांडणीमुळे गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव संपूर्ण राज्याला परिचित आहेत. गेली अनेक वर्षे कोकणच्या राजकारणात संघर्षमय वाटचाल करीत आ.भास्करशेठ जाधव यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळा ठसा उमटवला आहे. आज मंगळवारी (१ ऑगस्ट) आमदार भास्करशेठ जाधव यांचा वाढदिवस साजरा होत आहे, त्या निमित्ताने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा थोडक्यात घेतलेला आढावा…. MLA Bhaskarsheth Jadhav Abhishtchintan Special
आ.भास्करशेठ हे चिपळूण तालुक्यातील तुरंबव गावचे. सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला, वडिलांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आमदार भास्करशेठ जाधव यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर सांभाळायला सुरुवात केली. यातच शिवसेनेच्या विचारांचे वारे कोकणात वाहू लागले. आमदार भास्करशेठ जाधव शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने भारावले आणि शिवसेनेत सक्रिय झाले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख झाले. जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते झाले. इथूनच त्यांच्या राजकीय वाटचालीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. चिपळूण मतदार संघातून दोनवेळा ते आमदार झाले, परंतु आमदार भास्करशेठ जाधव यांच्या राजकीय जीवनात संघर्ष त्यांच्या पाचवीलाच पूजलेला आहे, असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. अनेक वेळा त्यांना राजकीय संघर्ष करावा लागला. MLA Bhaskarsheth Jadhav Abhishtchintan Special
२००४च्या विधानसभा निवडणुकीत आमदार भास्करशेठ जाधव यांना शिवसेनेकडून उमेदवारी नाकारली गेली, तेव्हा स्वाभिमानी असलेल्या भास्करशेठ यांनी अपक्ष निवडणूक लढवली. शिवसेनेच्या प्रभाकर शिंदे यांचे डिपॉझिट त्यांनी जप्त केलं, परंतु थोडक्यात त्यांचा पराभव झाला. पुढे ते राष्ट्रवादीत दाखल झाले आणि राष्ट्रवादीतही आपल्या कामाचा त्यांनी ठसा उमटवला. विधान परिषदेचे आमदार झाले. चिपळूण मतदार संघात विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे असल्याने त्यांना नवा मतदार संघ शोधावा लागला. त्यानी गुहागर विधानसभा मतदार संघाची निवड केली. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदार संघात त्यांनी पेरणी केली आणि हा मतदार संघ राष्ट्रवादीला मिळवून दिला. २००९च्या निवडणुकीत विद्यमान आमदार डॉ. विनय नातू, शिवसेनेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा पराभव करीत ते विजयी झाले आणि शरद पवार यांनी त्यांना मंत्री करून त्यांचा खऱ्या अर्थाने गौरव केला. गुहागर विधानसभा मतदार संघाला मंत्रीपद मिळाले. या संधीचे आमदार भास्करशेठ जाधव यांनी सोनं केलं. नगर विकास खाते सांभाळताना त्यांनी केवळ आपल्या मतदार संघातच करोडो रुपयांची विकास कामे केली, असं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला. MLA Bhaskarsheth Jadhav Abhishtchintan Special
गुहागर विधानसभा मतदार संघात एक अभ्यासू आणि विकास कामांची जाण असणारे नेतृत्व आमदार भास्करशेठ जाधव यांच्या रूपाने गुहागरला मिळालं. त्यांनी गुहागर ग्रामपंचायतचे नगर पंचायतीत रूपांतर केले. स्मरणात राहतील, अशी असंख्य काम केली. गुहागर विधानसभा मतदार संघातून ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतात. २०१९च्या निवडणुकीत आमदार भास्करशेठ जाधव यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादी सोडून स्वगृही शिवसेनेत परतावे लागले. ते निवडून आले. महाविकास आघडीची सत्ता आली. अनुभव असून व ज्येष्ठ असूनही त्यांना मंत्रिपद मिळाले नाही, मात्र त्यांनी याचा विचार केला नाही. ते काम करीत राहिले. वर्षभरापूर्वी शिवसेना फुटली. तेव्हा आमदार भास्करशेठ जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची साथ धरली. इतकेच नव्हे, तर उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी मैदानात उभे राहून विरोधकांसाठी समोर दोन हात करणारा नेता म्हणून आमदार भास्करशेठ जाधव यांच्याकडे सध्या पाहिले जाते. MLA Bhaskarsheth Jadhav Abhishtchintan Special
उत्कृष्ट संसदपटू असणारे आमदार भास्करशेठ जाधव यांना विधिमंडळात अभ्यासपूर्ण भाषण करताना अनेकांनी पाहिले आहे. सध्याच्या विधिमंडळात सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. विधिमंडळातील त्यांचे अभ्यासपूर्ण भाषण, वक्तृत्व शैली त्यामुळे अनेक वेळा विरोधकांना ते चीत करतात. आक्रमक होतात. ठाकरे शिवसेनेकडून विरोधकांना थेटपणे भिडणारे आमदार भास्करशेठ जाधव संपूर्ण महाराष्ट्राने गेल्या दोन अधिवेशनामध्ये पाहिले आहेत. अभ्यासपूर्ण भाषण, कोकणातील विषयाची, प्रश्नांची जाण असणारा हा नेता आहे. MLA Bhaskarsheth Jadhav Abhishtchintan Special
संघर्षमय वाटचालीत त्यांना कोकणातीलच नेत्यांच्या विरोधात, आपल्याच पक्षातील सहकाऱ्यांच्या विरोधात अनेक वेळा संघर्षाची भूमिका घ्यावी लागते. खासदार सुनील तटकरे यांच्याशी कधी विरोधाची, तर कधी जुळवून घ्यायची भूमिका त्यांना घ्यावी लागली. राणे कुटुंबाशी त्यांना कायमच संघर्ष करावा लागला, पण या संघर्षातूनही आमदार भास्करशेठ जाधव पुढे चालतच राहिले. MLA Bhaskarsheth Jadhav Abhishtchintan Special
राष्ट्रवादीत असताना प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले . कोकणाला पहिल्यांदाच एका राष्ट्रीय पक्षाचे प्रदेश अध्यक्षपद मिळाले. त्यांनी पक्षात शिस्त आणली. प्रत्येक संधीचे त्यांनी सोनं केलं. राजकीय जीवनात असताना त्यांनी स्वतःची एक चौकट निर्माण केली. प्रस्थापित असलेल्या संस्थांवर ते कधीच गेले नाहीत, इतरांची चौकट त्यांनी मोडली नाही आणि स्वतःच्या चौकटीच्या बाहेरही ते कधी गेले नाहीत. हे विशेष. MLA Bhaskarsheth Jadhav Abhishtchintan Special
आमदार भास्करशेठ जाधव गेली अनेक वर्ष राजकारणात असले, तरी ते कुटुंबवत्सल आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्याकडे आमदार भास्करशेठ जाधव यांचा वारसदार म्हणून पाहिलं जात आहे. दोन मुले, दोन मुली असा आमदार भास्करशेठ जाधव यांचा संसार फुलला आहे. पत्नी सुवर्णताई जाधव यांची त्यांना त्यांच्या राजकीय, सामाजिक जीवनात साथ राहिली आहे. संपूर्ण कुटुंब एकत्रित असून आमदार भास्करशेठ यांच्यासोबत असते, हे विशेष. आज आमदार भास्करशेठ जाधव यांचा वाढदिवस आहे. कोकणच्या या सुपुत्राला, लढवय्या नेत्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! MLA Bhaskarsheth Jadhav Abhishtchintan Special