मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून येण्याचा विक्रम
गुहागर, ता. 23 : गुहागर विधानसभा मतदारसंघातून आमदार भास्कर जाधव 2830 (एकूण मते 71 हजार 241) मतांनी विजयी झाले. दुसऱ्या क्रमांकावरील महायुतीचे राजेश बेंडल यांना 68 हजार 411 मते मिळाली. या विजयामुळे आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर मतदारसंघातून सलग चौथ्यावेळा निवडून येण्याचा विक्रम केला आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेले मनसेचे उमेदवार प्रमोद गांधी 6652 मते यांना मिळाली. MLA Bhaskar Jadhav won from Guhagar
गुहागर विधानसभा मतदारसंघातील निवडणुक अटीतटीची झाली. त्यामुळे २३ फेऱ्यांची मतमोजणी होईपर्यंत मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांचा शुकशुकाट होता. अखेरच्या 2 फेऱ्यांमध्ये आता आमदार जाधव यांचे मताधिक्य तुटू शकत नाही असे लक्षात आल्यावर जाधव समर्थक कार्यकर्ते जल्लोष करु लागले. कार्यकर्त्यांप्रमाणेच आमदार जाधव ही मतमोजणी पूर्ण झाल्यावरच मतदान केंद्रात आले. महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल मात्र पराभव दिसत असूनही मतमोजणीच्या शेवटच्या फेऱ्या सुरु असताना मतमोजणी कक्षात आले होते. शेवटची फेरी संपल्यानंतर आमदार जाधव यांचे मतमोजणी कक्षातील कार्यकर्ते बाहेर पडले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील निराशा त्यांना लपविता आली नाही. मात्र महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार आमदार जाधव मतमोजणी केंद्राकडे आले त्यावेळी आजुबाजुला गटागटाने असलेले उबाठा शिवसैनिक एकत्र आले आणि त्यांनी आमदार जाधव यांना डोक्यावर घेत एकच जल्लोष केला. MLA Bhaskar Jadhav won from Guhagar
मतमोजणीच्या सुरवातीच्या चार फेऱ्यांमध्ये 7 हजार 779 चे मताधिक्य भास्कर जाधव यांनी घेतले होते. मात्र त्यानंतर सलग तीन फेऱ्यांमध्ये राजेश बेंडल यांनी 2190 चे मताधिक्य घेतले. पुढे कायमच 4 ते 5 हजारांच्या फरकात दोन्ही उमेदवार मागे पुढे चालत होते. अखेरच्या फेऱ्यांमध्ये राजेश बेंडल यांनी मताधिक्य घेतले मात्र अडीच हजाराचा फरक ओलांडणे त्यांना शक्य झाले नाही. प्रथमदर्शनी खेड तालुक्यातील 90 बुथनी चिपळूण तालुक्यातील ग्रांग्रई, मालघर, रामपूर, बामणोली, दोणवली येथेही आमदार जाधव यांना साथ दिली असल्याचे समोर येत आहे. गुहागर तालुका आणि मुर्तवडे, वहाळ, कळंबट या परिसरातून महायुतीला साथ मिळाली. गुहागर शहरामध्ये राजेश बेंडल यांना मताधिक्य मिळाले मात्र त्याहीपेक्षा अधिक मतदान मिळेल अशी अपेक्षा होती ती फोल ठरली. MLA Bhaskar Jadhav won from Guhagar
आपल्या विजयाबाबत बोलताना आमदार जाधव म्हणाले की, विजय हा विजय असतो. मला मतदार संघातील सर्व समाज घटकांनी मतदान केले. विरोधकांनी ही निवडणूक एका विशिष्ठ दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न फोल ठरला. यापुर्वीही कमी मताधिक्याने मी निवडून आलो. त्यामुळे मताधिक्य कमी असल्याबाबत मी काहीच बोलणार नाही. मात्र संपूर्ण महाराष्ट्राच्या निकालात काहीतरी काळबेरं नक्की आहे. सकाळी मतमोजणीला सुरवात झाली तेव्हा महाविकास आघाडी आणि महायुतीला समान संधी होती. मात्र अवघ्या तीन तासांत चित्र पालटले. हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रातील निकाल महायुतीच्या बाजुने दिसु लागले. हा संशोधनाचा विषय आहे. माझ्याबाबतीतही तेच घडले असावे असा मला दाट संशय आहे. या निकालांमध्ये लाडकी बहीणीचा परिणाम दिसून येत असेल तर मराठवाड्यात मनोज जरांगे फॅक्टर का दिसत नाही. MLA Bhaskar Jadhav won from Guhagar
महायुतीचे पराभुत उमेदवार राजेश बेंडल म्हणाले की, हा निसटता पराभव म्हणावा लागेल. महायुतीमधील सर्व घटकपक्षाचे, संस्था, संघटनांचे कार्यकर्ते यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतरचे 15 दिवस प्रचंड मेहनत घेतली. सर्व सामान्य जनतेने माझ्यावर विश्र्वास दाखवला. त्यामुळेच ही निवडणूक अटीतटीची झाली. त्यामुळे पराभवाने खचून न जाता आता आणखी जोरात कामाला लागणार आहे. भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत. या निवडणुकांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. MLA Bhaskar Jadhav won from Guhagar
निकाल जाहीर करण्यास 2 तासांचा विलंब
गुहागर विधासभा मतदारसंघातील मतदान केंद्र निहाय निकाल दुपारी 1.40 वाजता अधिकृतपणे जाहीर झाला. त्यानंतर पोस्टल मतदानाचा निकाल 2.30 वा जाहीर झाला. मात्र आमदार भास्कर जाधव यांच्या विजयाची अधिकृत घोषणा 4 वाजता करण्यात आली. दरम्यानच्या काळात मतमोजणी केंद्रात पुर्नमोजणी संदर्भातील चर्चा सुरु होत्या. MLA Bhaskar Jadhav won from Guhagar