• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अंजनवेल जल जीवन निधीचा दुरुपयोग

by Manoj Bavdhankar
January 25, 2024
in Guhagar
147 2
1
Misuse of Anjanvel Jal Jeevan Fund
289
SHARES
827
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

 यशवंत बाईत यांचा २६ जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा

गुहागर, ता. 25 : तालुक्यातील अंजनवेल गावासाठी जलजीवन योजनेंतर्गत नळपाणी पुरवठा राबवताना अनेक त्रुटी असून या योजनेतून निधीचा दुरूपयोग सुरू आहे. याकडे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने अंजनवेल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तसेच पंचायत राज व ग्रामविकास जिल्हा संयोजक यशवंत बाईत यांनी २६ जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा पंचायत समितीला निवेदनाद्वारे दिला आहे. Misuse of Anjanvel Jal Jeevan Fund

या निवेदनात म्हटले आहे की, पेठ अंजनवेलसाठी पाणी योजना घेताना ज्या संस्थेने पहाणी अहवाल तयार केला त्या अहवालात अनेक गंभीर त्रुटी आहेत. याचे अंदाजपत्रक सुमारे ५५ लाख १५ हजार १७० रूपये तयार करण्यात आले. यामधून खोदाई करण्यात आलेल्या विहिरीला पुरेसा पाणीसाठा न झाल्याने ती बुजवण्यात आली. भूजल सर्वेक्षण विभागाने ज्या जागेत पाणी तपासणी करून दाखला दिला होता. त्या जागेत विहीर न घेता चुकीच्या जागेत विहीर घेतली. मात्र याकडे शासकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. Misuse of Anjanvel Jal Jeevan Fund

पेठ अंजनवेल साठी शासनाकडे सुमारे १ कोटी १८ लाख २७ हजार २८२ रूपये अंदाजपत्रकाची नवीन पुर्नयोजना तयार केली आहे. तसेच मौजे अंजनवेलसाठी पाणी योजना घेतानाही ज्या संस्थेने पहाणी अहवाल तयार केला त्या अहवालातही अनेक गंभीर त्रुटी आहेत. ८५ लाख ८३ हजार ३९८ रूपये अंदाजपत्रकाची योजना घेण्यात आली. असून या योजनेत जी विहीर दाखवली आहे, त्या विहीरींचे मार्च महिन्यापासून पाणी कमी होते. मे महिन्यात विहीरीची पातळी पूर्णपणे तळाला जाते. त्यावेळी ग्रामस्थांना दोन दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. अशा अनेक गंभीर त्रुटी असून डिसेंबर २०२२ पासून यावर पत्रव्यवहार करत असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे २६ जानेवारी २०२४ पासून गुहागर पंचायत समिती कार्यालयासमोर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे. Misuse of Anjanvel Jal Jeevan Fund

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMisuse of Anjanvel Jal Jeevan FundNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share116SendTweet72
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.