आसिफ दळवी, मोदींनी अल्पसंख्याक समाजाला आधार दिला
गुहागर, ता. 03 : मुस्लिम विद्यार्थ्यांना बारावीनंतरचे शिक्षण घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिष्यवृत्ती दिली. अल्पसंख्याक योजनेतून विकासाची कामे केली. यांच्या उलट काँग्रेस सरकारने केवळ आमच्या समाजाची मते लुटली. तरीही आघाडीचे लोक मुस्लिम समाजाची दिशाभूल करत आहेत. असे प्रतिपादन भाजप अल्पसंख्याक सेलचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आसिफ दळवी यांनी केले आहे. Misled Muslims by Mahavikas Aghadi
दळवी म्हणाले की, सध्या कोकणातील 90 टक्के मुस्लिम समाज आघाडीच्या सोबत असल्याचा प्रचार केला जात आहे. विरोधक जाणीवपुर्वक हा भ्रम पसरवत आहेत. त्यासाठी नागरिकत्व देणार्या कायद्याचा उलटा प्रचार चालू आहे. तुमचे नागरिकत्व काढून घेणार, तुम्हाला देश सोडून जावे लागणार. अशी भिती मुस्लिम समाजात पसरवली जात आहे. हे लक्षात आल्यावर महायुतीने मुस्लिम समाजाच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. मोदीजी पंतप्रधान झाल्यावर अल्पसंख्याक समाजाच्या मुलांना बारावीच्या परीक्षेनंतरचे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळू लागली. त्याचा फायदा आज गुहागर तालुक्यातील 25 ते 30 विद्यार्थी घेत आहेत. मोदीजींनी पंतप्रधान झाल्यानंतर अल्पसंख्यांकांच्या वस्त्यांचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला. गुहागर विधानसभा मतदारसंघात या निधीतून जवळपास एक कोटीची काम अल्पसंख्यांक वस्त्यांमध्ये झाली आहेत. सीएए या कायद्याने 2014 पूर्वी भारतात स्थलांतरित झालेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन या धर्मातील लोकांना नागरिकत्व देण्यात येणार आहे. याचा मुस्लिम समाजाचे नागरिकत्व हिरावून घेण्याची कोणताही संबंध नाही. एनआरसीबाबत सुद्धा चुकीचा भ्रम पसरवला जात आहे. पंतप्रधान मोदींनी पीएम किसान सन्मान योजना, उज्वला गॅस योजना, आभा कार्ड अशा वेगवेगळ्या योजना देताना धर्म पाहिला नाही. या देशातील सर्वधर्मीय समाजाचा विकास मोदीजींना अभिप्रेत आहे. ही गोष्ट देखील मुस्लिम समाजाने लक्षात घेतली पाहिजे. Misled Muslims by Mahavikas Aghadi
या गोष्टी आम्ही समाजात जाऊन सांगत आहोत. सात मे रोजी होणाऱ्या मतदानामध्ये याचे सकारात्मक परिणाम निश्चित दिसणार आहेत. त्यामुळे समाज बांधवांनी विरोधकांकडून होणाऱ्या चुकीच्या प्रचाराला बळी पडू नये. असे आवाहन आम्ही मोहल्ल्यात जावून करत असल्याचे आसिफ दळवी यांनी सांगितले. Misled Muslims by Mahavikas Aghadi