• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरी शहरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

by Guhagar News
June 10, 2025
in Guhagar
199 2
0
Minor girl kidnapped from Ratnagiri
391
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी, ता. 10 : शहरातील धनजीनाका येथे एका नॉव्हेल्टी दुकानात काम करणा-या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Minor girl kidnapped from Ratnagiri

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवार ८ जून रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. मुरुगवाडा येथे राहणारे अलीसाहेब हसनमियों मुकादम (वय ४०) यांची मुलगी अजबा अलीसाहेब मुकादम ही नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी ९ वाजता धनजीनाका येथील एका नॉव्हेल्टी दुकानात कामावर गेली होती. मात्र नेहमीप्रमाणे ती दुपारी ३ वाजेपर्यंत घरी परत न आल्याने तिच्या कुटुंबियांना काळजी वाटू लागल्याने वडिल अलीसाहेब मुकादम यांनी तात्काळ अजबा हिचे मालक अनसार मेमन यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी अजबा दुपारी २ वाजता दुकानातून निघून गेल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी मांडवी, भाट्ये, एस.टी. स्टँड परिसरात तिचा शोध घेतला. तसेच नातेवाईकांशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता ती सापडू शकली नाही. Minor girl kidnapped from Ratnagiri

Minor girl kidnapped from Ratnagiri

अलीसाहेब मुकादम यांनी या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात रात्री १२ वाजण्याच्या सुमारास तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १३७ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी शहरातून अल्पवयीन मुलीचे दिवसाढवळ्या अपहरण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलीस अजबा अलीसाहेब मुकादम हिचा शोध घेत आहेत. Minor girl kidnapped from Ratnagiri

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsMinor girl kidnapped from RatnagiriNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share156SendTweet98
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.