• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 October 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सैनिकी शाळांमध्ये शैक्षणिक सत्र सुरू

by Manoj Bavdhankar
August 5, 2022
in Bharat
16 1
0
Military school started
32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संरक्षण मंत्रालयाने भागीदारी पद्धतीने 7 नव्या सैनिकी शाळांना मंजुरी

नवी दिल्ली, ता.5 : भागीदारी पद्धतीने शंभर नव्या शाळा स्थापन करण्याच्या केंद्र सरकारच्या उद्दिष्टांअन्वये, पहिल्या टप्प्यात 12 शाळा सुरू करण्यासंदर्भात सैनिक स्कूल सोसायटी मध्ये सहमती करार करण्यात आला. सैनिक शाळा पद्धतीनुसार अशा 10 शाळांमध्ये विद्यार्थ्यांची प्रवेश पूर्तता झाल्यानंतर, 9 शाळांमध्ये शैक्षणिक सत्र 1ऑगस्ट 2022 पासून सुरु झाले आहे. 6 सप्टेंबर 2022 पासून कर्नाटक मधल्या एका शाळेत शिक्षणाला सुरुवात होणार आहे . उर्वरित दोन शाळा या ग्रीनफील्ड स्कूल असल्याने, त्यांचे कामकाज हे पुढच्या शैक्षणिक सत्रा पासून सुरू होईल. यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सैनिक स्कूल सोसायटीने, या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात 7 अतिरिक्त शाळांना मंजुरी दिली आहे.  Military school started

या प्रस्तावित 7 शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया आणि शैक्षणिक सत्र हे ऑगस्ट 2022 च्या शेवटपर्यंत  सुरू होण्याची शक्यता आहे. या नव्याने मंजुरी मिळालेल्या सैनिकी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया ही पहिल्या टप्प्यात मंजुरी मिळालेल्या शाळांप्रमाणेच असणार आहे. या नव्याने मंजुरी मिळालेल्या सैनिकी शाळेमध्ये 40% जागा या ऑल इंडिया सैनिक स्कूल्स एंट्रन्स एक्झाम म्हणजेच अखिल भारतीय सैनिकी शाळा प्रवेश पात्रता परीक्षा (AISSEE) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्या मधून ई कौन्सिलिंग च्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. आणि यातल्या 60% जागा या शाळांमध्ये पूर्वीपासून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) अर्थात राष्ट्रीय पात्रता संस्थेने घेतलेल्या परीक्षेच्या माध्यमातून भरल्या जातील. Military school started

यासाठी न्यू सैनिक स्कूल एन्ट्रन्स एक्झामिनेशन 2022(NSSEE-22) ही परीक्षा ऑगस्ट महिन्याच्या मधल्या काळात राष्ट्रीय पात्रता संस्थेमार्फत घेतली जाईल. नव्याने मंजुरी मिळालेल्या शाळेतील प्रवेश प्रक्रिया समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी  https://sainikschool.ncog.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. असा सल्ला देण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात मंजुरी मिळालेल्या सैनिक शाळांची यादी खालील प्रमाणे Military school started

Sl. No.STATEDISTT.NAME OF SCHOOL
1ANDHRA PRADESHSPS NELLOREADANI COMMUNITY EMPOWERMENT FOUNDATION
2BIHARPATNAKESHAV SARASWATI VIDYA MANDIR
3GUJARATMEHSANADUDHSAGAR RESEARCH AND DEVELOPMENT ASSOCIATION
4HARYANAROHTAKSHRI BABA MASTH NATH AYURVEDIC AND SANSKRIT SHIKSHAN SANSTHAN
5KARNATAKAMYSURUSWAMI VIVEKANANDA YOUTH MOVEMENT
6KERALAKOZHIKODEVEDVYASA VIDYALAYAM SENIOR SECONDARY SCHOOL
7MAHARASHTRASANGLIS K INTERNATIONAL SCHOOL

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMilitary school startedNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.