सोहळा दि. २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता
गुहागर, ता. 20 : ग्राहकांच्या विश्वासाला पात्र असलेल्या श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, चिपळूण या संस्थेच्या उमरोली शाखेचे स्थलांतर करण्यात येणार आहे. हा सोहळा दि. २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांच्या हस्ते होणार आहे. Migration of Shri Samarth Bhandari Umroli Branch

मनीषा कॉम्प्लेक्स, तळमजला साई मंदिर समोर, उमरोली फाटा, ता. चिपळूण येथे श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्थलांतरित शाखेचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. तरी समस्त ग्राहक, हितचिंतक यांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. Migration of Shri Samarth Bhandari Umroli Branch
श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., चिपळूण या पतसंस्था रत्नागिरी जिल्हयातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून नावलौकीक प्राप्त केला आहे. या संस्थेची स्थापना १३ जून २००२ रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री प्रभाकर वि. आरेकर यांनी केली. संपूर्ण कोकण विभाग कार्यक्षेत्र असलेल्या या संस्थेने विश्वासार्ह पतसंस्था म्हणून संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये नावलौकिक कमावला आहे. संस्थेला प्रगतीपथावर नेण्याचे काम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री प्रभाकर वि. आरेकर यांनी आपले सहकारी संचालक यांचे सहकार्याने केले आहे. सुरक्षितता, विश्वासार्हता, पारदर्शकता व व्यावसायिकता या प्रमुख तत्वांवर संस्थेचे कामकाज सुरू असून त्यामुळे सभासद व ठेवीदार यांचा विश्वास संपादन करण्यात संस्था यशस्वी ठरली आहे. Migration of Shri Samarth Bhandari Umroli Branch
