• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मयुरेश माने यांना  MIE EXPERT  पुरस्कार जाहीर

by Mayuresh Patnakar
September 12, 2022
in Guhagar
16 0
0
MIE EXPERT Award to Mane

मयुरेश माने

32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नाविन्यपूर्ण अध्यापनासाठी मायक्रोसॉफ्टतर्फे दुसऱ्यांदा निवड

गुहागर, ता. 12 : येथील हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक कै. व्हि.एस. माने यांचा मुलगा मयुरेश माने दहिवली येथे माहिती तंत्रज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन सुलभ पध्दतीने विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी मायक्रोसॉफ्टच्या विविध टूल्सचा सहाय्याने नाविन्यपूर्ण प्रयोग केले. त्यांच्या या प्रयोगांची दखल मायक्रोसॉफ्ट कंपनीने घेतली. ‘मायक्रोसॉफ्ट इनोव्हेंटीव्ह एज्युकेटर एक्स्पर्ट’ हा पुरस्कार देवून त्यांना गौरविले  आहे. यापूर्वीही त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. MIE EXPERT Award to Mane

मुळचे गुहागरचे असलेले मयुरेश माने हे चिपळूण तालुक्यातील दहिवली बु.।। येथील रत्नाकर शिक्षण संस्था संचलित रत्नसागर इंग्लिश स्कूल येथे माहिती तंत्रज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर माध्यमिक तंत्रस्नेही समुह महाराष्ट्र (TSTSMAHARASHTRA) चे  सक्रीय सदस्य आहेत. या समुहाद्वारे तंत्रज्ञानाचा वापर करुन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपला विषय कसा शिकवावा याबद्दल नाविन्यपूर्ण प्रयोग केले जातात. हे प्रयोग भारतासह परदेशातील शिक्षकांना ऑनलाईन पध्दतीने शिकवले जातात. त्यांनी  मायक्रोसॉफ्टच्या विविध टूल्स बरोबर Flip, WAKALET, चा वापर करून अध्यापन रंजक केले. 2021 मध्ये विद्यार्थ्यांना सोबत घेवून Rise UP 4 E Waste  (इ कचऱ्यांचे पर्यावरणपुरक विघटन) हा प्रकल्प बनवला.  मायक्रोसॉफ्टने आयोजीत केलेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातील १७ शाळा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील फक्त 3 शाळांनी सहभाग घेतला. यामध्ये मयुरेश माने यांच्या प्रकल्पाला जागतिक स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला. कोरोना काळात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी यावर्षी मयुरेश माने   ROAD TO RECOVERY  या प्रकल्पावर काम करत आहेत. MIE EXPERT Award to Mane

अशा पध्दतीने अध्यापनात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शिक्षण पद्धतीला नव्याने वेगळे आयाम देणाऱ्या मयुरेश माने यांच्या प्रयोगांची दखल मायक्रोसॉफ्टने घेतली. त्यांना ‘मायक्रोसॉफ्ट इनोव्हेंटीव्ह एज्युकेटर एक्स्पर्ट’  या पुरस्काराने गौरविले. त्याबद्दल रत्नाकर शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सरीता घाग, सचिव हेमकिरण घाग, संचालक, शाळेचे मुख्याध्यापक सुरेश पांडुरंग भंडारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी मयूरेश मानेचे अभिनंदन केले आहे.  MIE EXPERT Award to Mane

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMIE EXPERT Award to ManeNews in GuhagarROAD TO RECOVERYTSTSMAHARASHTRAUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.