• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 August 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

by Manoj Bavdhankar
February 2, 2023
in Politics
332 4
0
Mhatre won in the teacher constituency
653
SHARES
1.9k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 02 : कोकण विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणी शांततेत पार पडली. या निवडणुकीत ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे हे विजयी झाल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली. Mhatre won in the teacher constituency

विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी दि. 30 जानेवारी रोजी मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज नवी मुंबईतील नेरुळ येथील आगरी कोळी भवन येथे विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या देखरेखीखाली पार पडली. यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून विशाल सोलंकी उपस्थित होते. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, रायगड चे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी, पालघर चे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय उपायुक्त मनोज रानडे आदी उपस्थित होते. Mhatre won in the teacher constituency

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

मतमोजणी साठी कोकण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. एकूण 99 मतपेट्या मध्ये मतपत्रिका होत्या. मतमोजणी साठी एकूण 28 टेबले ठेवण्यात आली होती. या निवडणुकीत एकूण  35069 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 33450 मते वैध ठरली तर  1619 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 16726 इतक्या मतांचा कोटा ठेवण्यात आला होता. Mhatre won in the teacher constituency

उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे 

 ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे – 20683 
धनाजी नानासाहेब पाटील – 1490 
उस्मान इब्राहिम रोहेकर – 75 
तुषार वसंतराव भालेराव – 90 
रमेश नामदेव देवरुखकर – 36 
बाळाराम दत्तात्रेय पाटील – 10997 
राजेश संभाजी सोनवणे – 63 
संतोष मोतीराम डामसे –  16 

पहिल्या पसंतीची 20,683 मते मिळवून जिंकून येण्यासाठीचा कोटा पूर्ण केलेले उमेदवार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे हे विजयी झाल्याचे विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कल्याणकर यांनी जाहीर केले. तसेच मतमोजणी केंद्राच्या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. Mhatre won in the teacher constituency

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMhatre won in the teacher constituencyNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share261SendTweet163
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.