मुंबई, ता. 18 : हवामान विभागाने सर्वात मोठा अलर्ट दिला आहे. राज्यात मे महिन्यासारखी स्थिती एप्रिल महिन्यातच होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाने दिलेल्या अलर्टकडे अजिबात कानाडोळा करू नये, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. त्यामुळे नागरिकांनी छत्री घेऊन किंवा डोक्यावर टोपी घालूनच बाहेर पडा नाहीतर उष्माघाताचा धोका जाणवू शकतो. Meteorological Department has issued a big alert
चार दिवस हवामानात मोठे बदल होणार असून तापमान 42 ते 45 डिग्रीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि उपनगरात वातावरण कोरडं राहणार आहे. तर कोकण पट्ट्यातही वातावरण कोरडं राहणार आहे. पावसाचा किंवा उष्णतेच्या लाटेचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. Meteorological Department has issued a big alert


18 ते २० एप्रिल दरम्यान अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव जिल्ह्यात उष्ण तापमान राहील, त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळात घराबाहेर पडू नये असा इशारा दिला आहे. घराबाहेर जाताना पाणी सोबत ठेवावे, शिवाय छत्री, टोपी घेऊन जावे कोणतीही हयगय करू नये असं म्हटलं आहे. त्यानंतर हळूहळू वातावरण बदलण्याची शक्यता आहे. पुढचे चार दिवस कोणताही पावसाचा किंवा गारपिटीचा इशारा देण्यात आला नाही. पावसाचं संकट टळलं असलं तरी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे. वायव्येकडून मध्य भारतापर्यंत तीव्र उष्णतेचा जोर आहे. पंजाबमध्ये पारा ४३ अंश सेल्सिअस ओलांडला आहे, तर राजस्थानमध्ये काही ठिकाणी तो ४५ अंशांच्या आसपास आहे. Meteorological Department has issued a big alert