केंद्रस्तरावर वैष्णवी डिंगणकर प्रथम तर अभिनव शिंदे व्दितीय
गुहागर, ता. 13 : तालुक्यातील वरवेली गावातील नवतरूण मित्रमंडळ व महिला मंडळ मधली शिंदेवाडी यांच्या वतीने स्पर्धा परिक्षेत नैपूण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आला. जिल्हा परिषदेमार्फत ‘आमचा रत्नागिरीचा भास्कराचार्य’ व ‘रत्नागिरी टॅलेंट सर्च’ (RTS) या स्पर्धा परिक्षा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये इ. 4 थीतील वैष्णवी सुनिल डिंगणकर व इ. 5 वीतील अभिनव मनोज शिंदे या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. Meritorious students felicitated at Varaveli

जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ‘आमचा रत्नागिरीचा भास्कराचार्य’ व ‘रत्नागिरी टॅलेंट सर्च’ (RTS) या स्पर्धा परिक्षा घेण्यात आल्या होत्या. या परिक्षांमध्ये वैष्णवी सुनिल डिंगणकर इ. 4 थी. हिने तालुकास्तरावर व्दितीय क्रमांक, बीट स्तरावर व्दितीय क्रमांक तर केंद्रस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याचप्रमाणे अभिनव मनोज शिंदे इ. 5 वी याने ‘आमचा रत्नागिरीचा भास्कराचार्य’ या स्पर्धा परिक्षेमध्ये बीट स्तरावर व्दितीय क्रमांक तर केंद्रस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांच्या या यशाबद्दल गौरव व प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. Meritorious students felicitated at Varaveli

यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री. शरद शिंदे, उपाध्यक्ष श्री. मधुकर शिंदे, ग्रामपंचायच सदस्या श्रीम. श्रावणी शिंदे, पोलिस पाटील सुजित शिंदे, श्री. मनोज शिंदे सर, श्री. सुनिल डिंगणकर सर, जेष्ठ नागरीक श्री. वसंत शिंदे, श्री. बाबुराव शिंदे, श्री. शांताराम शिंदे, श्री. शिवाजी धुमक, श्री. यशवंत धुमक, श्री. रमेश शिंदे, महिला मंडळ अध्यक्षा सुनिता डिंगणकर तसेच वाडीतील सर्व सदस्य, सर्व महिला मंडळ सदस्य उपस्थित होते. उपस्थितांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या भावी उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. Meritorious students felicitated at Varaveli

