रत्नागिरी, ता. 20 : मुंबई विद्यापीठातर्फे उत्तम कामगिरी करणाऱ्यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार दिला जातो. सन 2022-23 साठी विद्यापीठातर्फे गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कारकरिता रत्नागिरी उपपरिसराचे मुख्य लिपिक या पदावर काम करणारे विक्रम जोयशी यांची निवड करण्यात आली असून त्यांचा गौरव अभिनेते सुबोध भावे यांच्या हस्ते संपन्न झाला. Meritorious Staff Award to Vikram Joyshi
मुंबई विद्यापीठाच्या 167 व्या वर्धापनदिनाचे अवचित्य साधून हा पुरस्कार जोयशी यांना देण्यात आला. कार्यालयीन कामकाज, सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक उपक्रम यांचा समन्वय साधणाऱ्या कर्मचाऱ्याचा गौरव हा पुरस्कार प्रदान करून केला जातो. विक्रम जोयशी यांना प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देवून गौरवण्यात आलं. मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. Meritorious Staff Award to Vikram Joyshi
यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. रविंद्र कुलकर्णी, कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ सुनील भिरूड यावेळी उपस्थित होते. चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसराचे प्रभारी संचालक डॉ किशोर सुखटणकर, सहाय्यक कुलसचिव अभिनंदन बोरगावे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विक्रम जोयशी यांचे अभिनंदन केले. Meritorious Staff Award to Vikram Joyshi