• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 October 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शृंगारतळी येथे कुणबी समाज विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा

by Guhagar News
July 28, 2023
in Guhagar
78 1
4
Merit ceremony of Kunbi students at Sringaratali
154
SHARES
440
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दि. ३० रोजी कुणबी समाजोन्नती संघ व कुणबी पतसंस्थेचा स्तुत्य उपक्रम

संदेश कदम, आबलोली,
गुहागर, ता. 28 : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका गुहागर (ग्रामिण) आणि गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमीटेड आबलोली यांच्या संयुक्त विद्यमाने कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थांचा सत्कार व गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा शृंगारतळी येथील गुहागर बाजार भवन येथे दि. ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे. Merit ceremony of Kunbi students at Sringaratali

Merit ceremony of Kunbi students at Sringaratali

शृंगारतळी येथील गुहागर बाजार भवन मधील लोकनेते, माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ बेंडल सभागृहात रविवार दि. ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता हा कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या गुणगौरव सोहळ्याचे अध्यक्षपद कुणबी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री.रामचंद्र हुमणे गुरूजी भूषविणार आहेत. या भव्य दिव्य सत्कार सोहळ्याला कुणबी समाजोन्नती संघ मुंबईचे गुहागर तालुकाध्यक्ष श्री.कृष्णा वणे तसेच गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष श्री.राजेश बेंडल यांची प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती लाभणार आहे.  तसेच B.A.,D.Ed. DSM. सहाय्यक शिक्षक श्री.अमित तुकाराम आदवडे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून मौलिक मार्गदर्शन करणार आहेत. Merit ceremony of Kunbi students at Sringaratali  

या सोहळ्याला विद्यार्थी मित्र आणि शिक्षणप्रेमी, कुणबी समाज बंधू – भगिनींनी बहूसंख्येने वेळेवर उपस्थित रहावे, असे जाहिर आवाहन कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका गुहागर(ग्रामिण) या समाज संघटनेचे उपाध्यक्ष श्री.पांडूरंग पाते, श्री.गणपत पाडावे, श्री.महादेव साटले, श्री.विलास वाघे, सरचिटणीस श्री. तुकाराम निवाते, सहचिटणीस श्री.अनंत पागडे, श्री.महादेव वणे, श्री.वैभव आदवडे, श्री.विजय अवेरे, खजिनदार श्री.तुकाराम दवंडे, कुणबी पतसंस्थेचे संचालक श्री. प्रदिप बेंडल, श्री. संदेश कदम, श्री.उदय गोरीवले, श्रीमती.वनिता डिंगणकर, सौ.श्रावणी पागडे, श्री.अमोल वाघे, श्री.संदिप पाष्टे, अनिल घाणेकर, कुणबी युवक मंडळ गुहागर तालुका अध्यक्ष श्री.सचिन म्हसकर, कार्याध्यक्ष श्री.संतोष सोलकर, सरचिटणीस श्री.प्रमोद गोणबरे यांनी प्रशिद्धी पत्रकाव्दारे केले आहे. Merit ceremony of Kunbi students at Sringaratali

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKunbiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMerit ceremony of Kunbi students at SringarataliNews in GuhagarUpdates of Guhagarकुणबीगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share62SendTweet39
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.