गुहागर, ता. 31 : तालुक्यातील कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका गुहागर (ग्रामीण) व गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आबलोली प्रधान कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि पतसंस्थेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा संयुक्त विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शृंगारतळी येथील लोकनेते, माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ बेंडल सभागृहात रविवार दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता घेण्यात येणार आहे. Merit ceremony by Kunbi Samojonnati Sangh
समाज शाखेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक अनेक उपक्रम कार्यरत असून प्रामुख्याने संत तुकाराम छात्रालय, गुहागर बाजार, कुणबी सहकारी पतपेढी मर्या.मुंबई, गुहागर तालुका कुणबी नागरी सह.पतसंस्था लिमिटेड आबलोली, शाखा शृंगारतळी, शाखा हेदवी, गणेश क्रेडिट को – ऑप. सोसायटी मुंबई या विविध संस्थांच्या माध्यमातून प्रामुख्याने प्रभात दिनदर्शिका, विद्यार्थी सत्कार व विद्यार्थी मार्गदर्शन शिबीर यांचे आयोजन करुन जनजागृतीचे काम अखंडपणे चालू आहे. Merit ceremony by Kunbi Samojonnati Sangh
या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याला गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आबलोली या पतसंस्थेचे चेअरमन श्री.रामचंद्र हुमणे गुरुजी, कुणबी समाजोन्नती संघ, शाखा तालुका गुहागर मुंबई अध्यक्ष श्री.कृष्णा वणे, माजी नगराध्यक्ष श्री.राजेश बेंडल आदी. मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून विद्यार्थी व पालकांनी या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याला बहूसंख्येने वेळेत उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन कुणबी समाजोन्नती संघाचे उपाध्यक्ष श्री.तुकाराम निवाते, महादेव साटले, विलास वाघे,विजय अवेरे, सरचिटणीस प्रदिप बेंडल, सरचिटणीस महादेव वणे, संदिप पाष्टे, रामचंद्र आडविलकर, गजानन धावडे, खजिनदार अनंत पागडे, सल्लागार गणपत पाडावे, चंद्रकांत पागडे, कुणबी पतसंस्थेचे संचालक उदय गोरीवले, वैभव आदवडे, संदेश कदम, अमोल वाघे, श्रीमती.वनिता डिंगणकर, सौ.श्रावणी पागडे, अनिल घाणेकर, कुणबी युवक मंडळ तालुका गुहागर अध्यक्ष मंगेश मते, सरचिटणीस सुचित मालप, खजिनदार सुशांत बारस्कर यांनी केले आहे. Merit ceremony by Kunbi Samojonnati Sangh