सन १९७२ मधील माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 20 : तालुक्यातील आबलोली येथील लोकशिक्षण मंडळ संचालित चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली येथे सन १९७२ मधील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या संयुक्त विद्यमाने दहावीच्या परिक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटवणा-या विद्यार्थांना पारितोषिक देऊन मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम मुख्याध्यापक श्री.डि.डि.गिरी यांचे अधिपत्याखाली नुकताच उत्साहात संपन्न झाला. Merit Ceremony at Abololi
यावेळी श्री.दिनेश नेटके यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. सन १९७२ सालच्या बॅचच्या वतीने माजी विद्यार्थी प्रतिनिधी श्री.रमाकांत साळवी, श्री.अर्जुन झगडे, श्री.एस.एल.सुर्वे यांची या कार्यक्रमाची उपस्थिती लक्षवेधी ठरली होती. यावेळी चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली या विद्यालयाचे इयत्ता १० वी मधील सिद्दि चंद्रकांत झगडे हिने ९१.६०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर अर्णव अमोल होवाळे याने ८८.२०% गुण मिळवून व्दितीय क्रमांक पटकावला आणि जान्हवी अनंत तटकरे हिने ८५.६० % गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला या यशवंत विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे रोख रक्कम ३०००/- रुपये, २०००/- रुपये, १०००/- रुपये पारितोषिक देऊन मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. Merit Ceremony at Abololi
यावेळी श्री.एस.एल.सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले व या पुढेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे प्रयत्न करु यासाठी माजी विद्यार्थ्यांकडे संपर्क करुन त्यांचेही सहकार्य मिळण्याचे प्रयत्न करण्याचे अभिवचन दिले. त्यानंतर मुख्याध्यापक श्री.डि.डि.गिरी यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थांचे अभिनंदन करुन यापुढे ही बहूसंख्य विद्यार्थी जास्तीत जास्त गुण मिळवून पारितोषिकाचे मानकरी ठरतील असा विश्वास व्यक्त केला. श्री.मनोहर मोहिते आणि शोभा शेट्ये यांच्या खास प्रयत्नांमुळे हा गुणगौरव सोहळा पार पडला. विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहकार्य करुन हा गौरव समारंभ यशस्वी केल्याबद्दल श्री.रमाकांत साळवी, श्री.अर्जुन झगडे यांनी सर्वांचे आभार मानले. Merit Ceremony at Abololi