• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ग्रा. वेळणेश्वर वाडदईमध्ये “मेरी मिट्टी मेरा देश” अभियान

by Guhagar News
August 24, 2023
in Guhagar
115 1
0
"Meri Mitti Mera Desh" campaign in Velneshwar
226
SHARES
646
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 24 : आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाल्यामुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव गेले वर्षभर विविध कार्यक्रम/उपक्रमांद्वारे संपूर्ण देशभरात राबविला जात असून समारोपनीय उपक्रमाला सुरूवात झालेली आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यांत मेरी मिट्टी मेरा देश (मिट्टी को नमन विरों को वंदन) अर्थात माझी माती माझा देश अभियान राबविण्याच्या सुचना शासनाकडून ग्रामपंचायतीना आलेल्या आहेत. प्रत्येक राज्यामध्ये गाव व शहरांपर्यंत आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता व्हावी, हा या उपक्रमामागील शासनाचा मुख्य उद्देश आहे. “Meri Mitti Mera Desh” campaign in Velneshwar

ग्रामपंचायत स्तरावर आलेल्या शासनाच्या सुचनेनुसार ग्रामपंचायत वेळणेश्वर वाडदईच्यावतीने  रविवार दि. 13/८/२०२३ रोजी जि. प. शाळा वेळणेश्वर न.१ येथे सदर अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. सर्व प्रथम सरपंच चैतन्य धोपावकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रस्तावनेत सदर उपक्रमाचा उद्देश सांगितला. त्या नंतर ज्या शूर विरांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान दिले त्या शूरवीरांना मानवंदना आणि आदरांजली वाहण्यासाठी उभारण्यात आलेल्या शिलाफलकाचे अनावरण सरपंच चैतन्य धोपावकर यांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुणे माझी स्वातंत्र्य सैनिक श्री बाळकृष्ण शिंदे निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी दिप प्रज्वलित करून शूरवीरांना आदरांजली अर्पण केली. “Meri Mitti Mera Desh” campaign in Velneshwar

त्या नंतर जि प शाळा वेळणेश्वर नंबर एक मध्ये मुख्याध्यापक श्री सोनवणे सर प्रमुख पाहुणे बाळकृष्ण शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि राज्यगीत गाऊन मानवंदना देण्यात आली.  यावेळी शाळेच्या सभागृहात आयोजित छोटेखानी सभेमध्ये  उपस्थित प्रमुख पाहुणे माझी सैनिक श्री बाळकृष्ण शिंदे, श्री निलेश पाटील आता शासकीय सेवेत असणारे श्री प्रीतम तांडेल यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. “Meri Mitti Mera Desh” campaign in Velneshwar

यावेळी पंचप्रण शपथ घेण्यात आली. यामध्ये भारतात २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू, देशाच्या समृद्ध वारसाचा गौरव करू, भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रति सन्मान बाळगू, देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू असे शपथेचे स्वरूप होते. शेवटी शासनाच्या सुचनेनुसार शाळा परिसरात सरपंच श्री चैतन्य धोपावकर, उपसरपंच अमोल जामसुतकर, ग्रामपंचायत सदस्य ,सदस्य शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप गावणंग, शाळा मुख्याध्यापक श्री सोनवणे सर शिक्षक श्री बाबासाहेब राशिनकर हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामस्थांनी आणलेली मुठभर माती कलशामध्ये एकत्र जमा करून पंचायत समिती गुहागर कार्यालयात पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आली. “Meri Mitti Mera Desh” campaign in Velneshwar

सदर कार्यक्रमाच्या वेळी ग्रामपंचायत सदस्य नितीन पोळेकर ,विलास घाणेकर, संपदा केळकर , सुप्रिया आरवलकर, एडवोकेट अमृता मोरे,, सौ नाटेकर ,  ग्रामविकास अधिकारी सौ पेडणेकर मॅडम ,विश्वजीत जासुतकर,शशिकांत इतापे, विनायक कांबळे, माजी सरपंच नवनीत ठाकूर ,अंगणवाडी सेविका, आशाताई  तसेच गावातील प्रमुख मान्यवर तसेच पत्रकार उमेश शिंदे, शिक्षक,शिक्षिका आणि विद्यार्थी पालक, ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राशिनकर सर यांनी केले. “Meri Mitti Mera Desh” campaign in Velneshwar

Tags: "Meri Mitti Mera Desh" campaign in VelneshwarGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMeri Mitti Mera DeshNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share90SendTweet57
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.