• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ग्रा. आबलोलीने राबविले “मेरी मिट्टी मेरा देश” अभियान

by Guhagar News
August 15, 2023
in Guhagar
216 2
0
"Meri Mitti Mera Desh" campaign in Aabloli
424
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 15 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांच्या वतीने भारत सरकार आणि मुंबई विद्यापिठ यांच्या सुचनां नुसार “मेरी मिट्टी मेरा देश” हे अभियान आबलोली ग्रामपंचायत येथे उत्साहात संपन्न झाले. यावेळी सरपंच सौ.वैष्णवी नेटके यांचे हस्ते ध्वजारोहन करून श्रीफळ वाढवून शहिद शुरविर जवानांच्या शिलालेखाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर माजी सैनिक अनंत पवार यांचे हस्ते शिलालेखाला पु्ष्पहार अर्पण करण्यात आला. “Meri Mitti Mera Desh” campaign in Aabloli

यावेळी राष्ट्रध्वजाला, शहिद शुरविरांच्या शिलालेखाला आणि आबलोलीच्या पवित्र भूमिला अभिवादन करून, मानवंदना देऊन दिपोत्सव साजरा करून पंचप्राण शपथ ग्रहण करून  “मेरी मिट्टी मेरा देश अभियानास प्रारंभ करण्यात आला. शहिद माजी सैनिक, शहिद पोलीस यांचे कुंटुंबीयांना तसेच माजी सैनिक अनंत पवार, सैनिक सचिन कदम, निवृत्त पोलीस सोनू पागडे, पी.एस.आय.सुशिल काजरोळकर, हवालदार प्रमोद पवार यांच्या सह अनेक मान्यवरांना सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य आदींच्या हस्ते शाल, श्रिफळ, पुष्पगुच्छ देऊन जाहिर सत्कार करून गौरविण्यात आले. “Meri Mitti Mera Desh” campaign in Aabloli

त्यानंतर वृक्ष वाटप व वृक्षारोपण कार्यक्रमही उत्साहात संपन्न झाला. ग्रामविकास अधिकारी श्री.बाबूराव सुर्यवंशी, माजी सैनिक अनंत पवार, तंटामुक्ती कमिटी अध्यक्ष आप्पा कदम, खरवते येथील शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालयाचा कृषीदूत आदित्य देशमूख, ग्रामपंचायत सदस्य श्री.उमेश पवार, संजय कदम, सरपंच वैष्णवी नेटके यांनी मौलिक मार्गदर्शन केले. “Meri Mitti Mera Desh” campaign in Aabloli

"Meri Mitti Mera Desh" campaign in Aabloli

या संपूर्ण अभियानात आबलोली सरपंच सौ.वैष्णवी नेटके, ग्रामविकास अधिकारी श्री.बाबूराव सुर्यवंशी, उपसरपंच अक्षय पागडे, मंडल अधिकारी श्री.आनंद काजरोळकर, तलाठी श्री. व्ही.व्ही.जोशी, पोलीस पाटील श्री.महेश भाटकर, ग्रामपंचायत सदस्य श्री.ऋषीकेश बाईत, उमेश पवार, संजय कदम, सौ.वृषाली वैद्य, सौ.पायल गोणबरे, सौ.शैला पालशेतकर, श्रीमती.नम्रता निमूणकर,  योगेश भोसले, प्रमोद गोणबरे, प्रमेय आर्यमाने, नरेश निमूणकर, मुख्याध्यापक श्री.राजदत्त कदम, सौ.ममता जाधव, श्री.दत्ताराम कदम, श्री.अनंत पागडे, श्री.के.बी.उकार्डे, बचत गटाच्या सी.आर.पी.सौ.मिनल कदम, सौ.भारती कदम, सौ.तृप्ती पवार, अंगणवाडी सेविका सौ.प्रिया कदम, सौ.सुनिता पवार, शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालय खरवते, तालुका चिपळूण या विद्यालयाचे कृषीदूत आदित्य देशमूख, आदित्य पाटील, प्रसाद मोरे, विश्वजित राजेशिर्के, ऋषीकेश राठोड, यांचेसह आबलोली गावातील महिला-पुरूष बहूसंख्येने उपस्थित होते. “Meri Mitti Mera Desh” campaign in Aabloli

Tags: "Meri Mitti Mera Desh" campaign in AabloliGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share170SendTweet106
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.